विजय शिवतारे ICU मध्ये असताना कौटुंबिक वादाची पोस्ट व्हायरल

ममता शिवतारे-लांडे यांनी शेअर केली फेसबुक पोस्ट.
Vijay-Shivtare
Vijay-Shivtare
Updated on

मुंबई: शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay shivtare) सध्या आजारी आहेत. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. विजय शिवतारे ICU मध्ये आहेत. शिवतारे नाजूक प्रकृतीमुळे रुग्णालयात दाखल असताना त्यांच्या मुलांमध्ये कौटुंबिक वाद सुरु आहेत. विजय शिवतारे यांची कन्या ममता शिवतारे-लांडे (mamta shivtare) यांनी एक फेसबुक पोस्ट (fb post) शेअर केली. ही पोस्ट आता व्हायरल झाली आहे. ममता स्वत: डॉक्टर असून प्रसिद्ध पोलीस अधिकारी शिवदीप लांडे यांच्या त्या पत्नी आहेत. (Vijay shivtare in icu of mumbai breach cand hospital family dispute post viral)

विजय शिवतारे देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्री होते. शिवसेनेने त्यांना प्रवक्तेपद दिले होते. पण २०१९ विधानसभा निवडणुकीत पुण्याच्या पुरंदर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या संजय जगताप यांनी त्यांचा पराभव केला. विजय शिवतारे हे सर्वात आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेकडून त्यांना मंत्रिपदही मिळाले. सध्या आजारपणामुळे विजय शिवतारे हे सक्रीय राजकारणापासून दूर आहेत. विजय शिवतारे यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याचं ममता यांनी सांगितलं आहे.

Vijay-Shivtare
कोरोनाने सुखी कुटुंब संपवलं, पतीनंतर महिलेची मुलासह आत्महत्या

ममता शिवतारे-लांडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटले आहे.

प्रिय बांधवांनो, माता भगिनींनो, आज दिनांक २२/०६/२०२१ वेळ पहाटे ३:००, ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या आय सी यू (ICU) विभागात बसून हे लिहिण्याची वेळ येईल असं वाटलं नव्हतं. मी ममता शिवदीप लांडे-शिवतारे, आजवर आपण बापूंच्या राजकीय कारकीर्दीत क्वचितच मला पाहिले असेल. मग आज मी बोलत आहे तर नक्कीच त्यामागे एक मोठ्ठ कारण आहे.

बापूंसारखे वडील मला मिळाले हे माझे भाग्य. मला त्यांनी फुलासारख जपलं. माझी प्रत्येक जबाबदारी अतिशय खंबीरपणे पार पाडली. मला अपार प्रेम दिल. माझ्या आयुष्यात त्यांना देवापेक्षाही वरच स्थान आहे. अश्या माझ्या पित्याची माझ्याच भावांनी संपत्तीच्या लोभापायी केलेली दयनीय अवस्था पाहून आज मी अत्यंत अवस्थ आहे. मागील काही दिवसात फेसबुक वरून होत असलेल्या पोस्टने आपल्या मनात संभ्रम निर्माण केला आहे. माझा भाऊ विनय विजय शिवतारे काही कौटुंबिक वादातून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी ही कित्येक वर्ष असाच त्रास बाबांनी सहन केला. मात्र कधीही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही, कारण त्यामुळे माझे भाऊ व त्यांच्या कुटुंबाला हानी पोहोचेल अस त्यांना वाटत होतं व आजही वाटतं.

Vijay-Shivtare
'शोले'चा रिमेक अन् संजय राऊत; भाजप नेत्याच्या ट्वीटची चर्चा

मागील वर्षी जानेवारी २०२० मध्ये अत्यंत गंभीर प्रकृती असताना त्यांचे बायपास झाले हे आपणा सर्वांना माहीतच आहे . डॉक्टरांनी त्यांच्या वाचण्याची शक्यता २० टक्के आहे असे सांगितले. माझा भक्कम असा आधारस्तंभ ढासळतो की काय या भीतीने माझी झोपच उडाली होती. ऑपरेशन यशस्वी झालं, मात्र त्यानंतरही जीवाला धोका असताना माझा मोठा भाऊ सतत धमक्या देऊन मानसिक त्रास देत होता. मागिल दीड वर्षापासून किडनीच्या आजारामुळे बाबा एक दिवसाआड डायलीसिसला जातात. या दीड वर्षात एकदाही माझ्या दोन्ही भावांपैकी कोणीही त्यांना भेटायला सुद्धा आले नाही. ते आहेत की नाही ? याची सुद्धा विचारपूस केली नाही. त्यांची प्रकृती नाजूक असल्याने मानसिक दबाव अजून वाढवून, त्यांना कमकुवत करण्याचे प्रयत्न सूरु झाले.

आजवर आयुष्यभर कमावलेली सगळी संपत्ती विनय व विनस व त्यांच्या कुटुंबाच्या नावे बाबांनी केली. तरीही जेजुरीतील इथेनॉल प्लांट नावावर करून देण्यासाठी वारंवार त्यांच्याकडून दबाव टाकण्यात येत आहे. या सर्व गोष्टीत मी कायम फक्त बघ्याची भूमिका बजावत होती. मी स्वतः डॉक्टर असल्याने त्यांच्या प्रकृतीची गांभीर्याने दखल घेत मी जानेवारी २०२१ मध्ये हॉस्पिटलचा राजीनामा दिला व पूर्ण वेळ बाबांसोबत राहून त्यांच्या कामाचा ताण कमी करण्याचा व आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कदाचित त्यांना बळ मिळाले आणि विनयच्या धमक्यांकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. मात्र, मागील दोन महिन्यांपासून तो दबाव सोशल मीडियाद्वारे बदनामी करून सतत वाढवला जात आहे. सर्व संपत्ती नावावर करूनही मानसिक त्रास कमी होत नव्हता. तो आताही अश्याच बदनामीच्या धमक्या देत आहे.

आपण माझ्या बाबांवर अफाट प्रेम केलंत. तेच त्यांच्यासाठी सर्वस्व आहे. ते प्रेम कधीही कमी पडू देऊ नका. आणि बाबाही अविरत पुरंदर साठी आपला जीव ओततील. आज सर्व काही सहनशीलतेच्या पलीकडे गेलं आहे आणि त्याच धक्क्याने त्यांना पहाटे हृदयविकाराचा झटका आला. आयसीयुमध्ये रात्री २:०० वाजता मी त्यांना घेऊन आली, ऍडमिट केले . माझी देवाला प्रार्थना आहे ,मला बळ दे!!!

काही प्रश्न आहेत, त्यावर नक्की आपणही सर्वांनी विचार करावा.

१)१९९४ मध्ये घडलेल्या घटना सत्य असोत वा असत्य, आज २७ वर्षानंतर त्या का आठवाव्यात ?

२) बाबांचा इतका द्वेष वाटत असेल तर त्यांचा राजकीय व आर्थिक व्यवहार विनय शिवतारेने २०१८ पर्यंत का सांभाळला?

३) बाबांनी कमावलेली संपत्ती आजवर दोघांनी निमूटपणे नावे का करून घेतली?

४)विनय शिवतारे व विनस शिवतारे यांनी स्वकर्त्वृत्वावर आजवर काय कमावल?

५) वाद सर्व घरात असतात, म्हणतात ना घरोघरी मातीच्या चुली... पण मृत्यूशय्येवर असलेल्या वडीलांसोबत असा व्यवहार कीतीही वाईट असले तरी कोणी मुलगा करणे योग्य आहे का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()