Wadettivar House Leak: वडेट्टीवारांच्या हॉलमध्ये बादल्या! विरोधीपक्ष नेत्याच्या शासकीय बंगल्यातील गळती थांबेना

मुंबईतल्या पावसानं आता नागरिक हैराण झाले आहेत तर दुसरीकडं वडेट्टीवार हे देखील त्रास्त झाल्याचं दिसून आलं आहे.
Vijay Wadettivar_House leak
Vijay Wadettivar_House leak
Updated on

मुंबईत सध्या गेल्या चोवीस तासापासून सातत्यानं संततधार पाऊस सुरु आहे. यामुळं मुंबईतील जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालं आहे. त्यातच या सातत्यानं पडणाऱ्या पावसामुळं विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय बंगळ्याचं छत गळायला लागलं आहे. त्यामुळं त्यांच्या हॉलमध्ये अक्षरशः बादल्या ठेवण्याची वेळ आली आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

Vijay Wadettivar_House leak
Vishalgad Violence: ...तर माजी खासदाराला पायताणाने हाणू! सकल हिंदू समाजानं दिला १९ जुलैला कोल्हापूर बंदचा इशारा

मुंबईतल्या पावसानं आता नागरिक हैराण झाले आहेत तर दुसरीकडं वडेट्टीवार हे देखील त्रास्त झाल्याचं दिसून आलं आहे. कारण मुंबईत राहत असलेल्या सरकारी निवासस्थानाचं छत पावसामुळं गळायला लागलं आहे. सिलिंगला करण्यात आलेल्या पीओपीमध्ये बसलेल्या बल्बच्या सॉकेटमधून पाण्याची गळती होत आहे. त्याचबरोबर पंख्यातूनही पावसाच्या पाण्याची गळती होत असल्याचं समोर आलं आहे.

Vijay Wadettivar_House leak
Mumbai Rain: मुंबईकरांना सावधानतेचा इशारा! येत्या ७२ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज

सातत्यानं छतामधून पाणी टपकत असल्यानं वडेट्टीवारांच्या घराच्या हॉलमध्ये बादल्या ठेवण्यात आल्या आहेत. याबाबत आपण संबंधीत यंत्रणेकडं तक्रार केलेली आहे पण अद्याप त्यांनी दुरुस्तीचं काम केलेलं नाही, असं वडेट्टीवार यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं. वडेट्टीवार म्हणाले की, "दहा दिवस झाले माझा टेलिफोन बंद आहे, घर गळत आहे. कुणाचंच याकडं लक्ष नाही, यांचं लक्ष कुठे आहे हे महाराष्ट्रातील जनतेपासून लपून राहिलेलं नाही. टेंडर काढणं कमिशन खाणं याकडं याचं लक्ष आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे"

Vijay Wadettivar_House leak
Vidhan Sabha Election 2024: ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईतल्या 25 जागांवर दावा? 'या' जागा लढवण्याची जोरदार चर्चा

मुंबई शहरात होत असलेल्या या कामांमधून सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हे धोकेबाज सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रातील लोकांना त्रास होत आहे, तिथं आमचा त्रास काय? अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी सरकारला टोला लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.