विकास मंदिर शाळेतील सेमी इंग्रजी माध्यमाची टक्केवारीची शंभरी, दोन विद्यार्थीनींना मिळाले 92.60%

विकास मंदिर शाळेतील सेमी इंग्रजी माध्यमाची टक्केवारीची शंभरी, दोन विद्यार्थीनींना मिळाले 92.60%
Updated on

Ulhasnagar News: मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यम राबवणाऱ्या उल्हासनगरातील विकास मंदिर सेमी इंग्रजी शाळेने इयत्ता दहावीच्या परीक्षेत टक्केवारीची शंभरी गाठली आहे.विशेष म्हणजे शाळेमधील दोन विद्यार्थीनींनी पहिल्यांदाच प्रथम क्रमांकाचे 92.60 टक्के समान गुण मिळवले आहेत.

कॅम्प नंबर 4 मध्ये विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यासमोर श्रीमती मताबाई विठ्ठल पाटील ढवळीकर ट्रस्ट द्वारा संचलित विकास मंदिर सेमी इंग्रजी माध्यमिक विद्यालय आहे.यंदा दहावीच्या परीक्षेत 76 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.त्यात सर्वच्या सर्व विद्यार्थी पास झाले असून यामध्ये वैष्णवी(प्राजक्ता)प्रमोद सुर्वे 92.60 % आणि साईश्वरी योगिता अनिल दोडे 92.60 % या दोन विद्यार्थिनींनी समान गुण मिळवून शाळेचे व पालकांचे नावलौकिक केले आहे.

मताबाई विठ्ठल पाटील ढवळीकर ट्रस्ट संचलित विकास मंदिर शिक्षण संकुलचे अध्यक्ष प्रा.व्ही.व्ही.पाटील,सचिव वसुधा डोंगरे,मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी चांगला अभ्यास करून शाळेचा शंभर टक्के निकाल लावणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com