मोखाडा: महायुती कडून विक्रमगड विधानसभेची जागा कोणाकडे असणार आहे आणि कोण ऊमेदवार आहे, हे अजुनही जाहीर करण्यात आलेले नाही. यापूर्वी आपल्या पक्षाचा ऊमेदवार येथुन निवडुन आल्याने, आपल्याच पक्षाला ऊमेदवारी मिळाणार, असल्याची आशा ठेवुन राष्ट्रवादी अजित पवार गटाने येथुन प्रचार सुरू केला आहे. तर भाजपने या मतदार संघावर आपले वर्चस्व असल्याचे सांगत, मतदार संघाची बांधणी करून विभाग निहाय बैठका घेत आहेत. त्यातच शिवसेना शिंदे गटाने एक पाऊल पुढे टाकत, ऊमेदवारी अर्ज घेतल्याने, महायुतीत विक्रमगड साठी मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे.