विक्रमगड नगरपंचायतीचा निकाल तीन दिवसांवर उमेदवांची धाकधुक वाढली

नेमका कौल कुणाला; उमेदवारांना धास्ती
विक्रमगड नगरपंचायतीचा निकाल तीन दिवसांवर उमेदवांची धाकधुक वाढली
Updated on

विक्रमगड(बातमीदार) : विक्रमगड नगरपंचायतीमधील 3 उमेदवार बिनविरोध झाल्याने 14 प्रभागातील निवडणुक 21 डिसेंबर रोजी झाली. विक्रमगड नगरपंचायत क्षेत्रातील 14 प्रभागात पुरुष मतदार -2401, स्त्री मतदार - 2459 एकूण - 4860 मतदार होते. या पैकी पुरुष मतदार -1919, स्त्री मतदार- 1937 एकूण -3856 मतदारांनी मतदान केले असुन मतदानाची टक्केवारी 79.34 इतकी आहे.

विक्रमगड नगरपंचायतीचा निकाल तीन दिवसांवर उमेदवांची धाकधुक वाढली
'विराटच्या राजीनाम्याचा निर्णय हा...', सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

एकूण 48 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले होते. 14 प्रभागात विक्रमगड विकास आघाडी- 14, भाजपा - 11 उमेदवार, राष्ट्रवादी-7, शिवसेना -9, काँग्रेस-3, मनसे - 2, अपक्ष-2 असे एकूण 48 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. भरघोस प्रतिसाद मतदानाला दिल्या नंतर मात्र निकाल उशिराने 19 जानेवारीला घोषित होणार असल्याने मध्येच बराच काळ लोटला आहे. आता हाच निकाल 3 दिवसांवर येवुन ठेपला असल्याने सध्यस्थित सर्वत्र पुन्हा एकदा निकालाची चर्चा व तर्कवितर्कना उधान आल्याचे चित्र दिसत आहे. पुन्हा एकदा राजकीय वातावरण निर्माण होत असतांना आता उमेदवारांची धाकधुक वाढली असुन नक्की मतदारांचा कौल कुणाच्या बाजुने लागतो अशी धास्ती उमेदवांना झोपु देत नसल्याचे उमेदवार सांगत आहेत.

सध्यस्थीत 48 उमेदवार रिंगणात उभे होते त्यामध्ये भाजप,राष्ट्रवादी, शिवसेना व विक्रमगड विकास आघाडी, मनसे,काँग्रेस या विविध पक्षांच्या, संघटनेच्या उमेदवारांनी रिंगणात उतलेले आहेत.

विक्रमगड नगरपंचायतीचा निकाल तीन दिवसांवर उमेदवांची धाकधुक वाढली
तिकीट कापल्याचं कळलं आणि अंगावर पेट्रोल ओतलं, सपाचे नेते आक्रमक

या मध्ये निलेश सांबरे प्रणीत व विक्रमगड विकास आघाडी तयार करण्यांत आली होती. विक्रमगड विकास आघाडी व श्रमजिवी संघटना यांची युती करण्यात आली होती. त्यांनी 14 जागांवर निवडणुक लढविली असुन त्यांचे तिन उमेदवार बिनविरोध आलेले आहेत. दरम्यान राष्ट्रवादी,मनसे,भाजपा, शिवसेना, काँग्रेस असे एकुण 48 उमेदवार सध्या आपले नशिब आजमावनार आहेत.

मागील निवडणुकीत नाराज उमेदवारांनी इतर पक्षास मदत केल्याने भाजपाला फटका बसला होता त्यामुळे त्यांना दोन जांगावर समाधान मानावे लागले. यातच निलेश सांबरे प्रणित विकास आघाडीने देखील पुर्ण ताकद पणाला लावुन व्युहरचना आखल्याने भाजपाला याचा ही फटका बसुन निवडणुकीत या पॅनलाल चांगले यश मिळाले होते. मात्र यंदाची निवडणुंकीत नाराजी दुर झालेली असल्याने तशी परिस्थिती राहीलेली नाही व विक्रमगड ग्रामपंचायत असतांना भाजपाचीच एकहाती सत्ता गेलें 25 वर्षे कायम होती. यंदा भाजप जोमाने या निवणुकीत उतरल्याने विकास आघाडीसाठी ते आव्हान दिल्याने ते कितपत खरे ठरते हे तीन दिसांवर येवुन ठेपलेल्या निकालानंतर स्पष्ट होईल.

विक्रमगड नगरपंचायतीचा निकाल तीन दिवसांवर उमेदवांची धाकधुक वाढली
सेटवर महिला सहकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याने मानेंना काढलं; वाहिनीचा खुलासा

मात्र या निवणुकीत विकास कामांचा आढावा मतदारांनी घेतला असल्याने विविध समस्यांनी ग्रासलेल्या विक्रमगड शहरा बरोरच अंतर्गत गाव-पाडयांना नगरपंचायतरुपी विकास तारणार का असा सवाल उपस्थित होत आहे. विक्रमगड नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये दिवसेंदिवस चालेली अनाधिकृत बांधकामे,गावठाण जागेवरील अतिक्रमणे,वारंवार खंडीत होणारा पाणीपुरवठा,खोडो-पाडी निर्माण होणारी पाणीटंचाई,रोजगारा अभावी होणारे नागरिकांचे स्थंलांतर,पाणी पुरवठयाची अपुरी सोय,कच-याची विल्हेवाट,प्रसाधगृहाचा अभाव,असल्याचा आरोंप विरोधी पक्ष करीत असुन. त्यामुळे येत्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये जनमत कोणत्या पक्षाच्या बरोबर राहाते हे बघणे महत्वाचे ठरणार ठरेल.

दरम्यान काही दिवसांवर येउन ठेपलेल्या या निकालाची चर्चा रस्त्यांवर गल्लीबोळातुन रंगु लागली आहे.

विक्रमगड नगरपंचायतीचा निकाल तीन दिवसांवर उमेदवांची धाकधुक वाढली
कोरोना लसीकरणाला एक वर्ष पूर्ण; भारतीयांनी घेतले 156.76 कोटी डोस

"गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही जनतेच्या सेवेमध्ये पुरीपुर्ण झालो आहेत व जनतेची विकास कामे नगरपंचातीमधुन केलेली आहेत.व जनता यंदाही आमचे बाजुने कौले देईल 3 उमेदवर बिनविरोधा झाले आहेत. उर्वरीत 14 प्रभामध्येही विक्रमगड विकास आघाडी व श्रमजिवी संघटना युतीचे वर्चस्व राहील"

-निलेश भगवान सांबरे (विक्रमगड विकास आघाडी)

"आम्ही विकासाच्या मुददयावर ही निवडणुक लढविल्याने व नगरपंचायतीमध्ये सत्ताधा-यांकडुन कोणत्याही प्रकारची विकास कामे झालेली नाहीत. अनेक सुविधाचा वनवा प्रत्येक प्रभागात दिसुन येईल.जनतेचा विकास भाजपाच करेल. त्यामुळे जनतेचा कौल आमच्याच बाजुने राहील. 11 जागावर आम्ही निवडणुक लढलो सहा जागेवर आमचा विजय होईल."

-जयप्रकाश आळशी (भाजपा तालुका अध्यक्ष)

विक्रमगड नगरपंचायतीचा निकाल तीन दिवसांवर उमेदवांची धाकधुक वाढली
फुग्यांसारखा रंग आमच्या आयुष्यात कधी...

"विक्रमगड नगरपंचायत निवडणुक आम्ही विकासाच्या मुद्दावर निवडणुक लढवली, मागील पाच वर्षात आम्ही विक्रमगड नगरपंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली असल्याने मतदारांनी आम्हला चांगला प्रतिसाद दिला, या निवडणुकीत श्रमजिवी संघटना व विक्रमगड विकास आघाडीची युती असल्याने आम्ही 17 पैकी 17 जागेवर विजय मिळवू."

-निलेश पडवळे (माजी उपनगरध्यक्ष, विक्रमगड विकास आघाडी)

"विक्रमगड नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेकडून 9 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले होते. त्या पैकी शिवसेनेचे 5 उमेदवार विजयी होतील."

-सागर आळशी (शिवसेना तालुका प्रमुख विक्रमगड)

"विक्रमगड नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पक्षा कडून 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. 2016 निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचा 1 उमेदवार विजयी झाला होता. या वेळी चांगले यश तसेच सर्वांच्या भुवया उंचावतील असे यश मिळण्याची आम्हला आशा आहे."

-विजय औसरकर (प्रभारी,राष्ट्रवादी पक्ष विक्रमगड नगरपंचायत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()