भगवान खैरनार, - सकाळ वृत्तसेवा.
Mokhada Latest News: महायुती आणि महाविकास आघाडी मध्ये जागा वाटपाचे गणिते अजुनही जुळलेले नाही. त्यामुळे ऊमेदवार देखील निश्चित झालेले नाहीत. पालघर मधील विक्रमगड विधानसभेच्या जागेसाठी महायुतीत भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
तर महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विद्यमान आमदार सुनिल भुसारा यांची ऊमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र, महायुती च्या तिनही पक्षाच्या संभाव्य ऊमेदवार आणि पदाधिकार्यांनी बुथ निहाय बैठका घेणे सुरू केले आहे. त्यामुळे विक्रमगड विधानसभेतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.