डोंबिवली - कल्याण (Kalyan) तालुक्यातील डोंबिवली (Dombivali) येथील उसरघर, बेतवडे, भोपर, संदप, मानपाडा, सोनारपाडा, घारीवली, कोळे, काटई या गावांची जमिन प्रिमियर ऑटोमोबाईल कंपनी (Automobile Company) लिमिटेड (LTD) यांना कारखान्यासाठी (factory) तत्कालिन ग्रुप ग्रामपंचायतींनी अटीशर्तीच्या अधीन राहून ठराव करून दिल्या होत्या. या जमिनीवर आता विकासकाने इतर विकासकामे (Development work) सुरू केल्याने ग्रामपंचायतीच्या जमिनी परत करा अशी मागणी प्रीमियर कंपनी जमीन बचाव भूमिपुत्र समितीने राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव संतोष केणे यांच्यासोबत प्रीमियर कंपनी जमीन बचाव भूमिपुत्र समितीच्या शिष्टमंडळातील प्रेमनाथ पाटील, मधुकर माळी, मनोहर पाटील, हनुमान पाटील, राहुल केणे यांनी बुधवारी शासकीय निवासस्थानी महसूल मंत्री थोरात यांची भेट घेतली. डोंबिवली जवळ असलेल्या उसरघर, बेतवडे, भोपर, संदप, मानपाडा, सोनारपाडा, घारीवली, कोळे, काटई या गावांची जमिन दि प्रिमियर ऑटोमोबाईल कंपनी लिमिटेड यांना कारखान्यासाठी तत्कालिन ग्रुप ग्रामपंचायत यांनी अटीशर्तीच्या अधीन राहून ठराव करून 470 एकर जमिन कवडीमोल दराने दिली होती. परंतू सदर जमिनी पैकी 181 एकर जमिनीवर कंपनीने कारखाना उभा केला होता.
उर्वरित जमिनीवर गावातील शेतकरी भातशेती करत होते. डोंबिवली येथील दि प्रिमियर ऑटोमोबाईल लिमिटेड कंपनीला तात्कालीन ग्रुप ग्रामपंचायतीच्या अटी शर्तीच्या अधीन राहून भुमिपुत्रांच्या जमिनी फक्त औद्योगिक कामांसाठी दिली असताना कंपनी मालकांनी बेकायदेशीरपणे खाजगी बिल्डरांना हस्तांतरीत करून शासनाची फसवणूक केली असल्याचे त्यांनी ग्रामस्थांची भूमिका मांडताना सांगितले. गावातील शिष्टमंडळासोबत सदर कंपनी बाबत विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आपल्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात यावे हि विनंती केली असून लवकरच शासकीय बैठक घेण्याचे आश्वासन थोरात यांनी दिले असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव केणे यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.