Missing Scientist: फुलं आणायला गेले अन् परतलेच नाहीत, राष्ट्रपती पदक विजेते शास्त्रज्ञ पाच दिवसांपासून बेपत्ता

Missing Scientist Bandra: माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपती पदक देऊन कोलवणकर यांचा गौरव केला होता.
Missing Person
Missing PersonEsakal
Updated on

अलीकडील काळात लोकांना मोठ्या प्रमाणात स्मृतीभ्रंश (अल्झायमर) आजाराला सामोरे जावे लागत आहेत. अशात आता मुंबईतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील बांद्रा येथून स्मृतीभ्रंश आजाराने ग्रस्त असलेले ७६ वर्षीय वैज्ञानिक विनायक कोळवणकर राहत्या घरातून बेपत्ता झाले आहेत.

गेल्या गुरुवारी शास्त्रज्ञ असलेले विनायक कोळवणकर फुले आणायला जातो असे सांगून घरातून बाहेर पडले होते. त्यादिवशी सकाळी 9:30 वाजता घराबाहेर पडलेले विनायक कोलवणकर आतापर्यंत परतलेच नाहीत.

दरम्यान या प्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Missing Person
Raju Patil Mns: मनसे आमदार राजू पाटलांविरोधात शिंदे गट लागला कामाला, या ठिकाणच्या घेतल्या भेटीगाठी!

बेपत्ता झालेले विनायक कोळवणकर हे बीएआरसीमध्ये वैज्ञानिक होते. भूकंपांची पूर्वसूचना देण्यासंदर्भात कोलवणकर यांनी मोलाचं काम केलं होतं. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपती पदक देऊन कोलवणकर यांचा गौरव केला होता.

दरम्यान कोलवणकर हे शेवटचे बांद्रा ईस्टच्या एमआयजी कॉलीनीमध्ये टी-शर्ट आणि स्ट्रीप्ड पँटमध्ये दिसले होते.

2008 मध्ये निवृत्त होण्यापूर्वी कोळवणकर यांनी BARC मध्ये 40 वर्षे काम केले. त्यांनी भूकंपशास्त्र, भूकंपाचा अभ्यास या विषयात विशेष प्राविण्य प्राप्त केले. त्याच्या संशोधनाने देशांना भूकंप होण्याआधीच्या स्थानांचा अंदाज लावण्यास मदत केली, ज्यामध्ये सूर्य, चंद्र आणि विशिष्ट ठिकाणांचा समावेश आहे. त्यांचे कार्य जगभरातील 125 भाषांमध्ये अनुवादित झाले आहे.

Missing Person
Ekanath Shinde: विधानसभा जिंकण्यासाठी मुख्यमंत्री लागले कामाला, शिवसैनिकांना दिला हा कार्यक्रम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.