"माज आला असेल तर..."; भाजप आमदाराचा Video झाला व्हायरल

"माज आला असेल तर..."; भाजप आमदाराचा Video झाला व्हायरल घडला प्रकार, तुम्ही पाहिलात का व्हिडीओ? Viral Video BJP MLA heating arguments with Municipal Corporation Officers in Ulhasnagar Dombivli
Ulhasnagar-BJP-MLAs
Ulhasnagar-BJP-MLAs
Updated on

तुम्ही पाहिलात का घडलेल्या प्रकाराचा व्हिडीओ?

उल्हासनगर: कोरोनाचा प्रभाव (Corona in Control) हळूहळू आटोक्यात यायला लागल्यानतंर आता जनहिताच्या कामांना पुन्हा वेग आला आहे. उसाटने येथे कचऱ्यावर वीज निर्मिती (Electricity Production from Waste) करणारा प्रकल्प (Project) उभारला जाणार आहे. या कामाच्या पाहणीसाठी उल्हासनगर (Ulhasnagar) महापालिकेचे अधिकारी आले होते. स्थानिक नागरिकांचा (Local People) या प्रकल्पाला विरोध (Oppose) असतानाही अधिकारी सीमांकनासाठी (Mapping and Marking) आल्याने भाजपा आमदार गणपत गायकवाड (BJP MLA Ganpat Gaikwad) अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. त्यांनी केलेल्या दमदाटीचा (Arguments) व्हिडीओ समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल (Video Viral) झाला आहे.

पाहा व्हायरल झालेला Video-

Ulhasnagar-BJP-MLAs
'प्रवासासाठी शिवपंख लावून द्या, लोक कामाला उडत येतील', मनसेचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

तळोजाजवळील उसाटने येथे कचऱ्यावर वीज निर्मिती करणारा प्रकल्प उभारला जाणार आहे. या जागेवर उल्हासनगर महापालिकेचा कचरा टाकला जाणार असून त्यासाठी राज्य शासनाने पालिकेला जागाही दिली आहे. मात्र या जागेवर कचरा टाकण्यास स्थानिक गावकऱ्यांचा विरोध आहे. सोमवारी उल्हासनगर पालिकेचे अधिकारी शासनाने दिलेल्या जागेचे सीमांकान करण्यासाठी आले होते. यावेळी आमदार गायकवाड अधिकाऱ्यांवर संतापले.

भाजप आमदार गणपत गायकवाड
भाजप आमदार गणपत गायकवाड
Ulhasnagar-BJP-MLAs
मंदिरांचाच निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा मारतो - आचार्य तुषार

काय म्हणाले आमदार गायकवाड?

"मी सत्ताधाऱ्यांना घाबरत नाही, सत्तेचा माज आला असेल, तर तो मला उतरवता येतो", असा दम त्यांनी दिला. त्यांचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. याविषयी आमदारांना विचारले असता ते म्हणाले, "तीन दिवसांपूर्वी माझे आयुक्तांसोबत बोलणे झाले होते. गावकरी आणि अधिकारी एकत्रित बैठक घेऊ असे सांगितले असतानाही आज पहाणीसाठी कसे येतात? या जागेच्या शेजारी शाळा असून शाळेच्या बाजूलाच डम्पिंग सुरू करण्यात आले आहे. त्या दुर्गंधीयुक्त वासात मुले कसे शिक्षण घेणार? त्यामुळेच गावकऱ्यांची मागणी आहे की याच सर्वेनंबरमधील पुढील जागा आहे तिकडे डम्पिंगचा प्रकल्प घ्या. मात्र राजकारण करून दडपशाही करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने मी त्यांना धारेवर धरले", असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.