तुम्ही पाहिलात का थक्क करणारा व्हिडीओ...
मुंबई: पावसाळा (Monsoon) आणि मुंबईत अपघात (Accidents in Mumbai) हे जणू काही समीकरणंच बनल्याचं दिसतंय. दर वर्षी पावसाळ्यात कुठे न कुठे अपघात घडतो. गेल्या आठवड्यातच मुंबईतील मालाड (Malad) आणि दहिसर (Dahisar) या दोन ठिकाणी इमारत किंवा इमारतीचे स्लॅब (Building slab collapsed) कोसळल्याची घटना घडली. त्यात अनेकांना आपला प्राण (Deaths) गमवावा लागला. तसेच, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळेही (Potholes) अनेकांचे अपघाती मृत्यू होतात. त्यामुळे इमारतींचे किंवा रस्त्यांचे बांधकाम हा मुंबईकरांसाठी कायमच चर्चेचा विषय असतो. पावसाळ्यामुळे बिल्डिंगचे मजले कोसळण्याच्या दुर्घटना अनेकदा घडतात. पण आज मुंबईतील घाटकोपरमध्ये चक्क जमीन फाटून कार जमिनीने गिळल्यासारखी घटना घडली. (Viral Video car sank into an underground well due to the erosion of land)
पाहा व्हिडीओ-
मुंबईतील घाटकोपरच्या राम निवास बिल्डींगसमोर नौरोजी लेन येथे चक्क जमिनीवर घातलेला स्लॅब खचल्याने एक कार डोळ्यांदेखत जमिनीच्या आत गेल्याची धक्कादायक घटना घडली. ही कार तपन किरण दोषी यांची आहे. जमिनीच्या खाली तयार करण्यात आलेल्या भूमिगत विहीरीत त्यांची कार पडल्याचे सध्या सांगितलं जात आहे. कार पार्क करताना ती भूमिगत विहिरीच्या स्लॅब वर उभी केली होती. पण तिथे पार्किंग करू नये अशा प्रकारचा कोणताही बोर्ड दिसून आला नाही. त्यामुळे तपन यांनी कार तिथे पार्क केली. विहीरीवरील स्लॅब कमकुवत असल्याने कारच्या वजनाने स्लॅब हळूहळू खचला आणि कार चक्क बघता बघता भूमिगत विहिरीत बुडाली आणि दिसेनाशी झाली. रविवारी सकाळी 8.30 च्या सुमारास ही घटना घडली. फक्त दिलासा देणारी बाब म्हणजे, यात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
कारच्या या घटनेशी महापालिकेचा काहीही संबंध नसून ही घाटकोपर भागातील खासगी सोसायटीतील घटना आहे असं स्पष्टीकरण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आले आहे. घाटकोपर पश्चिम परिसरातील एका खासगी सोसायटीच्या परिसरात उभी असलेली एक कार पाण्यात बुडत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या अनुषंगाने महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे कळविण्यात आले आहे की, या व्हिडिओतील घटना १३ जूनला सकाळी घाटकोपर पश्चिम परिसरात घडली. या सोसायटीच्या आवारात एक विहिर आहे. या विहिरीच्या अर्ध्या भागावर 'आरसीसी' करून ती विहीर झाकण्यात आली होती. त्या 'आरसीसी' केलेल्या भागावर सोसायटीतील रहिवाशी 'कार पार्क' करत असत. या 'आरसीसी'चा भाग खचून त्यावर पार्क केलेली एक कार पाण्यात बुडाली, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. या कारमध्ये कोणीही नसल्याने घटनेत कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही. तसेच कोणीही जखमी झालेले नाही.
या घटनेनिमित्त महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाद्वारे पाणी उपसण्याच्या कामाचे समन्वयन करण्यात येत आहे. तसेच सदर ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना तातडीने करण्यास संबंधित सोसायटीला सूचित करण्यात आले आहे. घाटकोपर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारीदेखील या प्रकाराबाबत माहिती घेत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.