Viral Video : भावा मानलं तुला! मुंबई लोकलमध्ये भांडण दोघांचं, पण चर्चा तिसऱ्याच व्यक्तीची !

 Viral Video : भावा मानलं तुला! मुंबई लोकलमध्ये भांडण दोघांचं, पण चर्चा तिसऱ्याच व्यक्तीची !
Updated on

Viral Video : मुंबईची लाईफ लाईन कोणती? असा प्रश्न जर तुम्हाला कोणीही विचारला तर तुम्ही सहज सांगाल ती म्हणजे मुंबई लोकल. या मुंबई लोकलमध्ये अनेकदा छोटे मोठे वाद नागरिकांमध्ये होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. यामुळे हे वाद काही मोठी गोष्ट नाही. अशातच एक असाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये आपण दोन जणांना एकमेकांशी भांडतांना पाहू शकतो. दोघांमध्ये नक्की कशामुळे वाद सुरू झाला? हे काही समजत नाहीये. मात्र हे दोघे एकमेकांशी वाद घालत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.

यावेळी हे भांडण चांगलेच विकोपाला गेल्याचे आपण पाहू शकतो. हे दोघे तर एकमेकांना मारण्यापर्यंत रागावले असल्याचे पाहायला मिळत आहे. याचबरोबर प्रसंगावधान साधत एका व्यक्तीने या दोघांचे भांडण सोडवले असल्याचेही आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो.

कोणीतरी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि नंतर तो व्हायरल झाला आहे. मात्र अशात या दोघांच्या भांडणामध्ये ज्या प्रकारे तिसऱ्या जणानी पंचाची भूमिका हाती घेत हे भांडण मिटवले यामुळे त्या तिसऱ्या व्यक्तीचे चांगलेच कौतुक होताना पाहायला मिळत आहे.

 Viral Video : भावा मानलं तुला! मुंबई लोकलमध्ये भांडण दोघांचं, पण चर्चा तिसऱ्याच व्यक्तीची !
Mumbai Crime : अट्टल फरार इराणी दुचाकी चोरट्या ला पोलिसांनी केली अटक

मुंबई मोटर्स या सोशल मीडिया हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात लिहिले आहे की 'जस्ट अ नॉर्मल डे सीन इनसाईडर मुंबई लोकल' लव्हड द सुपर कूल रेफ्री

यावेळी या व्हिडिओवर कमेंट करताना नागरिकांनी देखील या व्हिडिओचा चांगलाच आस्वाद घेतल्याचे पाहायला मिळत आहे. कारण त्यांनी त्यात तिसऱ्या व्यक्तीचे प्रचंड कौतुक केले आहे. कित्येक नागरिकांनी ज्या प्रकारे त्या तिसऱ्या व्यक्तीने मध्ये येऊन या दोघांचे भांडण सोडवले यासाठी त्या व्यक्तीचे प्रचंड कौतुक केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()