Video: मोठं झाड कोसळताना महिलेने पाहिलं अन्...

महिला चालत असताना जोरदार वारा आला... पाहा अंगावर काटा आणणारा प्रसंग
Video: मोठं झाड कोसळताना महिलेने पाहिलं अन्...
Updated on
Summary

महिला चालत असताना जोरदार वारा आला... पाहा अंगावर काटा आणणारा प्रसंग

मुंबई: तौक्ते नावाच्या चक्रीवादळाने (Cyclone Tauktae) महाराष्ट्रात सोमवारी धुमाकूळ घातला. या वादळामुळे तब्बल सहा जणांना (6 Deaths) आपले प्राण गमवावे लागले. तर ९ जण गंभीर जखमी (Injured) झाले. या वादळाचा तडाखा इतरही काही आस्थापनांना बसला. वादळाचा पूर्वअंदाज वर्तवण्यात आला होता. त्यामुळे किनारपट्टीजवळ (Coastal Areas) राहणाऱ्या सुमारे १२ हजार ५०० जणांना सुरक्षित स्थळी वेळीच हलविण्यात आले. सध्या वादळाच्या वेळीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये (Video) एक महिलेने झाड कोसळताना पाहिल्यानंतर स्वत:चा चपळाईने बचाव केल्याची घटना कैद झाली. (Viral Video woman narrow escape when tree uprooted and fell in front of her)

Video: मोठं झाड कोसळताना महिलेने पाहिलं अन्...
मुंबई: तरूणाला विनामास्क पकडलं अन् पोलिसांना बसला धक्का

मुंबईतील एका चिंचोळ्या रोडवरून एक महिला जात होती. ती चालत असताना जोरदार वारा आला. तिच्यासमोर एक भलं मोठं झाड कोसळताना तिने पाहिलं. इतका भयावह प्रसंग असताना काय करावं हे अनेकांना सुचत नाही. पण त्या महिलेने प्रसंगावधान राखलं. झाड पडतंय हे पाहताच तिने अत्यंत चपळाईने तेथून पळ काढला. झाड कोसळलं तेव्हा क्षणाचाही विलंब लावला असता तर त्या महिलेला गंभीर दुखापत होण्याची शक्यता होती. पण नशीब बलवत्तर असलं आणि प्रसंगावधान राखलं तर कोणत्याही संकटाचा सामना करता येऊ शकतो, असंच या घटनेने शिकवल्याची भावना नेटिझन्सकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, वादळाचा धोका कमी झाला असला तरी जिल्ह्यांनी मदत कार्य वेगाने सुरु ठेवावे आणि परिस्थिती पूर्वपदावर आणावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी रात्रीच दिल्या. चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे होत असला तरी कोकणातील मुसळधार पाउस व जोरदार वारे पाहता सावधगिरी बाळगण्याच्या आणि यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देशही ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तौक्ते चक्रीवादळामुळे एकूण २ हजार ५४२ घरांची पडझड झाली. राज्यात ठाण्यात २, रायगडमध्ये ३ तर सिंधुदुर्गमध्ये १ असे एकूण ६ जण मरण पावले. याशिवाय, मुंबईत ४, रायगड आणि रत्नागिरीत प्रत्येकी २ आणि ठाण्यात १ व्यक्ती जखमी झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()