मुंबई : विक्री विना पडून असलेल्या विरार-बोळींज येथील घरांच्या विक्रीसाठी म्हाडाची धडपड सुरू आहे. त्यानुसार म्हाडाने घर खरेदीदारांची किचकट कागदपत्रांच्या अटीतून सुटका केली असून कोणत्याही कागदपत्रशिवाय केवळ आधार कार्ड आणि पॅनकार्डवर पात्रता निश्चित केली जाणार आहे. तसेच या घरांच्या विक्री साठी लॉटरी न काढता प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वानुसार घरे दिली जाणार आहेत.
म्हाडाची विरार-बोळींज येथे हजारो घरे विक्रीविना पडून आहे. घरे बांधून तयार असतानाही त्याची विक्री होत नसल्याने म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने सदर घरांची एकगठा विक्री योजना सुरू केलेली असतानाच आता सोशल मीडियावरही सदर घरांच्या विक्रीसाठी सोशल मिडियावर कॅम्पेन सुरू केले आहे. त्यानंतर आता म्हाडाच्या घर खरेदीसाठी पात्र ठाण्याकरिता आवश्यक असलेल्या कागदपत्रांची जाचक अटी शिथिल केली आहे. त्यामुळे आता केवळ आधार कार्ड आणि पॅन कार्डवर पात्रता निश्चित होणार आहे. परिणामी गरजूंना सहजपणे घर मिळू शकणार आहे.
दोन आठवड्यात घराचा ताबा
बोळींज येथील म्हाडाच्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले आहे. तसेच सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पामुळे पुरेसे पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे पात्र झालेल्या घर खरेदीदाराने म्हाडाला पैसे भरल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यात सर्व कागदपत्रांची पूर्तता करून संबंधिताला घराचा ताबा दिला जाणार असल्याचे म्हाडाने स्पष्ट केले आहे. २-बीएचकेची सुमारे २३ लाख रुपये तर २-बीएचकेची ४१ लाख रुपये किंमत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.