Mumbai Accident News: इमारतीची भिंत कोसळून तीन महिला मजुरांचा मृत्यू; तर 2 जण जखमी

पाच कामगार या मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले होते, त्यातील तिघांचा मृत्यू
Accident News
Accident Newsesakal
Updated on

विरारमध्ये बांधकाम चालू असणारी भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन महिला मजूरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज काल दुपारी 3.30 तीन वाजता घडली आहे. विरारच्या रेल्वे स्टेशन जवळ स्नेहांजली इमारतीच्या बाजूला पुनर्विकास प्रक्रियेतील इमारतीच फायलिंगच काम सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडली आहे. सध्या विरार पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

विरार पूर्वेच्या स्टेशन जवळ स्नेहांजली इमारतीच्या बाजूला सुरू असणाऱ्या इमारतीजवळ घडली आहे. फायलिंगपासून चौदा फुट उंच भिंतीच काम सुरु होतं. दुपारी 3.30 च्या सुमारास अचानक एका बाजूची भिंत कोसळली आणि तिथे काम करणारे पाच मजूर त्या भिंतीखाली दबले गेले. या घटनेत तीन महिला मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.(Marathi Tajya Batmya)

Accident News
NMC Promotion : महापालिकेच्या इतिहासातील पदोन्नत्यांचा सर्वात मोठा गैरव्यवहार? घोडे-पाटलांचे कारनामे

शाहूबाई अशोक सुळे (वय वर्षे 45), लक्ष्मीबाई बालाजी गावाने (वय वर्षे 45), राधाबाई एकनाथ नावघरे ( वय वर्षे 40) असे मृत महिला कामगारांची नाव आहेत. तर यात एक महिला नंदाबाई अशोक गव्हाणे (वय वर्षे 32) आणि एक पुरुष मजूर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या ठिकाणी एकूण 12 मजूर काम करत होते. काही जण तातडीने बाहेर निघाल्यामुळे ते वाचले आहेत.(Latest Marathi News)

Accident News
Mahabaleshwar : प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! महाबळेश्‍वरला जाताय? मग, 'या' मार्गात झालाय मोठा बदल

बिल्डराने सुरक्षेचे कोणतेही उपाययोजना आखलेल्या नव्हत्या. भिंतीचं बांधकाम निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप जुन्या रहिवाशांनी केला आहे. मृत सर्व मजूर हे नाका कामगार आहेत. हे सर्वजण मराठवाडा नांदेड, परभणी येथील रहिवाशी आहेत. कामासाठी ते वसई, नालासोपारा, विरार परिसरात नाका कामगार म्हणून काम करीत होते.(Marathi Tajya Batmya)

Accident News
Krupal Tumane Vs Ajit Pawar : गद्दार कोण हे महाराष्ट्राला ठाऊक; कृपाल तुमाने यांचे अजित पवारांवर टीकास्त्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.