Virar Local : लोकलमध्ये महिला डब्यात विरारकरांचे बसण्यावरून अनोखे पोस्टर व्हायरल

उपनगरीय रेल्वे मार्गावर प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असताना पश्चिम रेल्वेवर प्रतिदिन गर्दीमुळे अनेक लहान मोठे वाद पहायला मिळतात.
local women bogie postar
local women bogie postarsakal
Updated on

मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असताना पश्चिम रेल्वेवर प्रतिदिन गर्दीमुळे अनेक लहान मोठे वाद पहायला मिळतात. अशात विरार लोकल म्हंटल तर लोकलमध्ये शिरण्यापासून बसायला मिळेपर्यंत महिला आणि पुरुषांच्या डब्यात वाद उफाळून येतात.

या रोजच्या वादविवादाना कंटाळून विरारच्या महिला प्रवाशांनी चक्क डब्यात एक मजेशीर पोस्टर लावले असून हे पोस्टर आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. हे पोस्टर पाहून अनेकांना हसू आवरणे कठीण होत आहे.

विरार लोकमधून रोज शेकडो महिला प्रवासी प्रवास करतात; ज्यांना अगदी विरारपासून दादर येईपर्यंत काही तास गर्दीत धक्के सहन करीत उभे राहून प्रवास करावा लागतो. विरार स्थानकावर लोकल खाली होत असूनही नालासोपारा डाऊन करणाऱ्यांमुळे अनेकांना बसायला मिळत नाही.

रोजच्या या समस्येला कंटाळलेल्या महिला प्रवाशांनी विरार लोकलमध्येसीट मिळण्यासाठी मजेशीर पोस्टर चिकटवले आहे. लोकलच्या एका डब्यात एक पोस्टर चिकटवल्याचे दिसते आहे. या पोस्टरवर नालासोपाऱ्यातील महिला आणि मुलींना विनंती करीत लिहिलेय की, 'खासकरून नालासोपारा डाऊन महिला आणि सर्व मुलींसाठी, कृपया माणुसकी म्हणून तुमच्यासमोर उभ्या असतील त्यांना बसायला द्यावे.

- आदेशावरून, सर्व कामकाजी महिलाप्रवासी.

दरम्यान, हे पोस्टर आता सोशल मीडियावर खूपच चर्चेचा विषय ठरत आहे. कारण- लोकलमधील सीटसाठी अशा हटके प्रकारे विनंती करण्याची ही पहिलीच वेळ असावी. दरम्यान, dimplewalii या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.