Vishalgad violence: धुक्यामुळे कारवाई करण्यात अडचणी आल्या; विशाळगडावर हिंसाचार प्रकरणी राज्य सरकारचा न्यायालयात अजब दावा

Vishalgad violence update: या प्रकरणी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, पुण्यातील हिंदू बांधव समितीचे रवींद्र पडवळ यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही राज्य सरकारने न्यायालयाला सांगितले.
Vishalgad violence
Vishalgad violenceesakal
Updated on

मुसळधार पावसामुळे कायदा-सुव्यवस्था हातात घेणाऱ्यांवरील कारवाईत अडचणी आल्याचा दावा राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. विशाळगड परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्या दिवशी मुसळधार पाऊस पडत होता आणि धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती. त्यामुळे त्या दिवशी गड परिसरात आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात अडचणी आल्याचे सांगण्यात आले आहे.

गुन्हे दाखल-

माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, पुण्यातील हिंदू बांधव समितीचे रवींद्र पडवळ यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने न्यायालयात दिली.


पोलीस कारवाई-

कोल्हापूर पोलिसांनी प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, १३ जुलै रोजी दोन पोलीस निरीक्षकांसह पोलिसांचा ताफा विशाळगडावर तैनात होता. यावेळी मुसळधार पाऊस, धुके आणि कमी दृश्यमानतेमुळे, काहीजण गजापूर गावात शिरले आणि संपत्तीची नासधूस केली. परिणामी गड परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला.

Vishalgad violence
Uran Murder Case: उरणमध्ये यशश्रीच्या हत्येपूर्वीचा CCTV समोर, दाऊद शेख पाठलाग करताना कैद!

पोलिसांचा गोंधळ -


१४ जुलै रोजी बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्यादिनी अनेकजण विशाळगडाकडे जातात. त्यामुळे लोकांना परवानगी द्यायची की नाही या गोंधळात अधिकारी होते, ज्यामुळे हिंसाचार झाला.

न्यायालयीन सुनावणी-

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.पी. कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. शाहुवाडी पोलिसांतर्फे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत २४ जणांना अटक करण्यात आली आहे, परंतु रवींद्र पडवळ फरारी आहेत. राज्य सरकारतर्फे ॲड. जनरल डॉ. बीरेंद्र सराफ यांनी बाजू मांडली, तर ज्येष्ठ वकील ॲड. सतीश तळेकर, ॲड. माधवी अय्यपन यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली.

Vishalgad violence
Uran Murder Case: यशश्री शिंदे प्रकरणात मोठी अपडेट, एकजण ताब्यात; दाऊद नाही तर मोहसीनने...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()