विष्णूदास भावे नाट्यगृहात तिसरी घंटा वाजणार; २२ ऑक्टोबरपासून सुरू होणार

vishnudas bhave auditorium
vishnudas bhave auditoriumsakal media
Updated on

नवी मुंबई : कोविडचे रुग्ण (corona patients) संख्या घटल्यामुळे गेले सहा महिने बंद असणारे वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह (vishnudas bhave auditorium) पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांसाठी (Audience) खुले होणार आहे. २२ ऑक्टोबरपासून नाट्यगृहात मनोरंजनाचे कार्यक्रम (Entertainment Event) आणि नाट्य प्रयोगांना (Drama Shows) सुरुवात होणार असून ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील काही तारखा आताच बुक करण्यात आल्या आहेत. पनवेल महापालिकेचे (Panvel municipal) आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह देखील २२ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

vishnudas bhave auditorium
BMC : चर पुनर्भरणात कोट्यवधींची खैरात; खर्च ३३६ कोटींवरून ३९६ कोटींवर

कोविडची पहिली लाट ओसरल्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये मराठी नाट्यनिर्माती संस्था आणि कालाकारांच्या मागणीस्तव महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी विष्णुदास भावे नाट्यगृह खुले केले होते. यावेळी नाट्यगृहात ५० टक्के प्रेक्षकांची उपस्थितीची अट घालण्यात आली होती. तसेच मराठी नाट्यनिर्माती संस्थांना भाड्यात तब्बल ७५ टक्क्यांची सूट दिली होती. परंतु कोविडच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा रौद्ररूप धारण केल्यानंतर काही महिन्यांसाठी खुले झालेली नाट्यगृहे पुन्हा बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली होती.

२ एप्रिल २०२१ ला विष्णुदास भावे नाट्यगृहात अखेरचा प्रयोग झाल्यानंतर गेले सहा महिने पडदा पडला होता. त्यानंतर नाट्यगृहाचा वापर जम्बो लसीकरण केंद्रासाठी करण्यात येत होता. अलिकडच्या काळात आरोग्य विभागातील झालेल्या ठोक मानधनावरील भरतीची प्रक्रीया करण्यासाठीही वापर करण्यात आला होता. आता पुन्हा कोविडची दुसरी लाट ओसरल्यामुळे राज्यातील कोविड निर्बंध कमी केले जात आहेत. जनजीवन पुन्हा सुरळीत होत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने दिलेल्या सवलतीनुसार २२ ऑक्टोबरपासून नाट्यगृह खुले होणार आहे. त्याकरिता आज विष्णुदास भावे नाट्यगृहात सकाळपासून स्वच्छता करण्यात आली, सभागृह, खुर्च्या, मंच, पडदे आदी निर्जंतुकीकरण करण्यात आले. तसेच धुरीकरण करण्यात येणार आहे. हवेतील विषाणू मारणाऱ्या ८ ओझोन मशिन बसवण्यात आल्या आहेत. गुरुवारी धुरीकरण करून घेतले जाणार आहे.

भावे नाट्यगृहाला पहिला दिवस मनोरंजनाचा

२२ ऑक्टोबरचा पहिल्या प्रयोगाकरिता वाशीचे विष्णुदास भावे नाट्यगृह बुक करण्यात आले आहे. मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर मराठी सिनेसृष्टीतील गाजलेले ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, भरत जाधव, वैभव मांगले यांच्याही नाट्यकलाकृती सादर होणार आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.