मोखाडा : मोखाड्यात मतदानाला सकाळी संथ गतीने सुरूवात झाली. मात्र, दुपारनंतर स्थलांतरीत झालेले मजुर परतल्याने आणि महिला मतदार, मतदानासाठी पुढे आल्याने मतदान केंद्रावर मोठी गर्दी झाली. परंतु सुर्यमाळ येथे मतदान यंत्र संथ गतीने काम करत असल्याने, मतदारांना रात्री ऊशीरा पर्यंत मतदान करण्यासाठी रांगेत उभे रहावे लागले आहे. मतदान केंद्राबाहेर विजेची व्यवस्था देखील करण्यात आली नव्हती, त्यामुळे मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.