मुंबई : बाई जेरबाई वाडिया रुग्णालय (wadia hospital) फॉर चिल्ड्रेन येथे लहान , किशोरवयीन मुले आणि तरुणांसाठी सिस्टिक फायब्रोसिसच्या निदानासाठी (cystic fibrosis treatment) तसंच, त्याचे अस्तित्व शोधण्यासाठी गोल्ड स्टँडर्ड स्वेट क्लोराईड चाचणीची (sweat chloride test)सुरुवात केली गेली आहे. सिस्टिक फायब्रोसिस हा एक अनुवांशिक रोग (genetic diseases) आहे, ज्यामुळे सतत फुफ्फुसाचे संक्रमण आणि श्वासोच्छवासाचा त्रास (lung paining) होतो. ही चाचणी करणारे वाडीया पश्चिम भारतातील पहिले रूग्णालय ठरणार आहे.
काय आहे सिस्टिक फायब्रोसिस ?
सिस्टिक फायब्रोसिस (सीएफ) एक अनुवांशिक विकार म्हणून कफ, घाम आणि पाचक द्रव तयार करण्याऱ्या पेशींवर परिणाम करतो. सतत घाम येणारी त्वचा, सायनुसायटिस, घरघर, सतत खोकला, अतिसार, न्यूमोनिया, ब्राँकायटिस यांसारखे फुफ्फुसांचे संक्रमण आणि वजन कमी होणे, स्निग्ध आणि मल बाहेर टाकण्यात येणा-या अडचणी ही सिस्टिक फायब्रोसिसची लक्षणे आहेत.
मुलांमध्ये आणि प्रौढांमधील सिस्टिक फायब्रोसिसचे सखोल निदान चांगले परिणाम साध्य करण्यात मदत करू शकते, यामुळे जगण्याचा दर सुधारुन अचूक व त्वरीत उपचार करणे शक्य होते. त्यामुळे घामातील क्लोराईडचे प्रमाण मोजण्यासाठी स्वेट क्लोराईड चाचणी सुरू केली आहे कारण सिस्टिक फायब्रोसिस असलेल्यांच्या घामामध्ये क्लोराईडचे प्रमाण वाढलेले असते.
दरवर्षी 100 हून अधिक रुग्ण
सिस्टिक फायब्रोसिस हा एक जटिल रोग आहे जो श्वसन आणि पाचक प्रणालीवर परिणाम करतो. दरवर्षी 100 हून अधिक नवीन रुग्ण रुग्णालयात सिस्टिक फायब्रोसिससाठी उपचार घेतात. भारताच्या संपूर्ण पश्चिम भागात घामाच्या क्लोराईडच्या पातळीची चाचणी करण्याचा हा अत्याधुनिक आणि सर्वात प्रगत मार्ग आहे. सिस्टिक फायब्रोसिसचे निदान करण्यासाठी ही चाचणी लहान मुले, पौगंडावस्थेतील आणि ब्रॉन्काइक्टेसिस, वारंवार होणारा न्यूमोनिया आणि इतर लक्षणांमध्ये वाढ न होणे यांसारख्या दीर्घकालीन आजार असलेल्या तरुण प्रौढांमध्ये केली जाते.
बालरोग श्वसन विभागाचे व्यवस्थापन करणारे डॉ. परमार्थ चांदणे यांनी सांगितले की, ज्या व्यक्तीला सिस्टिक फायब्रोसिसचा कौटुंबिक इतिहास किंवा सिस्टिक फायब्रोसिसकडे निर्देश करणारी लक्षणे असतील तेव्हा चाचण्या कराव्या लागतात. या चाचणीपूर्वी, त्वचेवर 24 तास कोणतेही क्रीम आणि लोशन लावू नयेत. घामातील क्लोराईड आयनचे प्रमाण निश्चित करण्यासाठी घामाची चाचणी करणे उपयुक्त ठरू शकते.
कशी असते ही चाचणी ?
ज्यांना सिस्टिक फायब्रोसिस आहे त्यांच्या घामामध्ये क्लोराईडचे प्रमाण जास्त असू शकते. घामाच्या चाचणीमध्ये, रुग्णाच्या त्वचेला घाम निर्माण करण्यासाठी उत्तेजित केले जाते, जे एका विशेष संग्राहकामध्ये शोषले जाते. ही चाचणी अर्ध्या तासात पूर्ण होते आणि त्यानंतर चाचणीचे विश्लेषण केले जाते. जर रुग्णाला 60 मिलीमोल्स प्रति लिटर पेक्षा जास्त क्लोराईड पातळी आढळली तर सिस्टिक फायब्रोसिस होण्याची शक्यता असते.
रुग्णालयात दरवर्षी विविध दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांपैकी सरासरी 1200 हून अधिक मुलांना श्वसनासंबंधी आजारांवर उपचार केले जातात. स्पायरोमेट्री आणि ब्रॉन्कोस्कोपी सारख्या अनेक आवश्यक प्रक्रियेसह. आता स्वेट क्लोराईड चाचणीची ओळख सिस्टिक फायब्रोसिसच्या संशयित रुग्णांसाठी वरदान आहे कारण त्यांना त्वरित उपचार मिळू शकतील असे वाडिया रुग्णालयाच्या सीईओ डॉ मिनी बोधनवाला यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.