मुंबईत परदेशी शिक्षणासाठी जाणार्‍या मुलांसाठी वॉक-इन लसीकरण

लसीकरणाच्या नियमांमध्ये बदल 
vaccination
vaccinationMedia Gallery
Updated on

मुंबई: मुंबईत लसीचा अभाव पाहता मुंबईतील लसीकरणाबाबत पालिकेला वेळोवेळी बदल करावे लागले आहेत. आता नव्या नियमांतर्गत अभ्यासासाठी परदेशात जाणाऱ्या मुंबईतील विद्यार्थ्यांना लसीकरणासाठी (student vaccination) वॉक-इन (Walk in vaccination) सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. वॉक-इन अंतर्गत, विद्यार्थ्यांना आठवड्याच्या सुरूवातीच्या तीन दिवसांत कस्तुरबा, राजावाडी आणि कूपर रुग्णालयात लस दिली जाऊ शकते. यासाठी त्यांना प्रवेशाची कागदपत्रे, व्हिसाची कागदपत्रे द्यावी लागतील. (Walk in vaccination facility for students who are going to foreign for education)

याशिवाय, 45 आणि 59 वयोगटातील नागरिक आठवड्यातील पहिल्या तीन दिवसांत वॉक इनद्वारे पहिला आणि दुसरा कोविशिल्ड लसीचा घेऊ शकतील. या वयोगटातील पहिल्या डोसमध्ये दिव्यांगांना प्राधान्य दिले जाईल. कोरोना लसीचा अजूनही मुंबईत तुटवडा आहे. या तुटवड्यामुळे पालिकेने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना त्यांच्या जवळच्या केंद्रांवर लस देणे थांबवले.

vaccination
चॅलेंजिंग ऑपरेशन, नौदलाच्या वीरांनी सांगितला समुद्रातील थरार

सोमवारपासून, 45 वर्षांवरील नागरिकांना वॉक-इन अंतर्गत कोविशिल्डचा पहिला आणि दुसरा डोस मिळू शकेल. फ्रंट लाइन आणि हेल्थकेअर कर्मचारी आठवड्याच्या पहिल्या तीन दिवसांत वॉक-इन अंतर्गत दुसरा डोस घेऊ शकतील. स्तनपान करणार्‍या मातांनाही या तीन दिवसांत वॉक-इन  लस दिली जाईल.

vaccination
पुढच्यावर्षी BMC निवडणूक वेळेवर झाली नाही, तर...

कोव्हॅक्सिन लसीच्या दुसर्‍या डोसमध्येही दिव्यांगांना प्राधान्य दिले जाईल. गुरुवार ते शनिवार या दिवशी डोस कोविन पोर्टलवर नोंदणीनंतर निश्चित वेळेवर उपलब्ध होईल. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, लसीकरणाच्या नियमात काही बदल झाल्यास मुंबईकरांना एक दिवस अगोदर याबाबत माहिती दिली जाईल.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()