हस्तशिल्प विकास आयुक्तालयाचा उपक्रम; कासा येथे वारली पेंटिंग क्लस्टर

warli painting artist
warli painting artistsakal media
Updated on

कासा : ग्रामीण भागातील वारली पेंटिंग (warli painting) करणाऱ्या कलाकारांचे शिबिर आज डहाणू (dahanu) तालुक्यातील कासा ग्रामपंचायत बिरसा मुंडा सभागृहामध्ये आयोजित केले होते. यामध्ये वारली कलाकारांना हस्तकला ओळखकार्ड (Identity card) वाटप करण्यात आले. 150 च्या आसपास वारली कलाकारांनी आपला सहभाग नोंदवला. 116 कलाकारांना हस्तकला ओळखकार्ड वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून हस्तकला आयुक्तालय वेस्ट झोन चे डायरेक्टर राजेंद्र सिंग (Rajendra singh) उपस्थित होते. कासा ग्रामपंचायतचे माजी सरपंच रघुनाथ गायकवाड, पंचायत समिती सदस्य अरुण कदम,महाराष्ट्र बँकेचे शाखा अभियंता विवेक सिंगल, तसेच आयुष् संस्थेचे सचिव डॉक्टर सुनील पराड, कीर्ती वरठा महिला श्रमिक मंडळ अध्यक्ष उपस्थित होते.

warli painting artist
Mumbai : डबेवाला भवनासाठी जागाच नाही!

या शिबिरा मध्ये आदिवासी कलाकारांना हस्तकला ओळखकार्ड चे होणारे फायदे, तसेच सध्या वारली पेंटिंग मधील नवीन ट्रेड, रोजगाराच्या संधी तसेच मुद्रा लोन विषयी मार्गदर्शन करण्यात आले. आयुष संस्थे च्या नोंदणीकृत कलाकारांसाठी मंत्रालयाच्या हस्तशिल्प विकास आयुक्तालयामार्फत विशेष शिबिरे आयोजित केली जातात यामध्ये हस्तकला व वारली चित्र कारासाठी साठी ओळख पत्र नोंदणी, वितरण, भौगोलिक उप दर्शनी,नोंद प्रक्रिया माहिती, विविध हस्तकला योजना विषयी माहिती,ई कॉमर्स पोर्टल नोंदणी हस्तकला हेल्पलाईन,मुद्रा कर्ज योजना व शासकीय योजनांच्या लाभ घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी याविषयी माहिती देण्यात येते. कल्पकता व हस्तकला माध्यमातून आदिवासी संस्कृती जतन करण्यासाठी आर्थिक स्वावलंबन होण्यासाठी मदत मिळू शकते. हे या शिबिरातून पटवून दिले.या शिबिरासाठी चांगला प्रतिसाद मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.