खर्डी : शहापुर तालुक्यातील मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर धरण 25 जुलै रोजी सकाळी 10.40 वाजता भरून वाहू लागले असून धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत.
तर भातसा धरण 25 जुलै रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत 131.81 मीटर टक्के भरले असल्याने येथील धरणाचे दरवाजे पाणीसाठा नियमित करण्यासाठी कधीही उघडू शकतात व त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होऊ शकतो त्यामुळे भातसा धरणाखालील गावे सापगाव पुलावरून येजा करणाऱ्या वाहनाना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा असे पत्र भातसा धरणाचे कार्यकारी अभियंता आर.बी.पवार यांनी तहसीलदाराना दिले आहे.
मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील तानसा धरण भरून वाहू लागले असून मोडकसागर व भातसा या धरणांच्या पाण्याची पातळीत चांगलीच वाढ झाली असून भातसा धरणाची पातळी 142.07 मीटर असून सद्यस्थितीत धरण 131.81 मीटर ने भरले आहे. सर्व धारणात पाण्याचा साठा वाढल्याने तूर्तास मुंबईकरांचे पाण्याचे टेन्शन मिटले आहे.
सापगांव येथील भातसा नदीची सद्याची पाणी पातळी 33.10 मीटर असून इशारा पाणी पातळी 36.061मीटर आहे तर येथील पाण्याची धोक्याची 36.552 मीटर असल्याने व भातसा धरण 25 जुलै सकाळी 8 वाजेपर्यंत 131.81 मीटर भरल्याने भातसा धरणाच्या खालील
साजिवली,सरलांबे,कासगांव,तुते,कवडास, सापगांव,बामणे,खुटघर,अंदाड यासारख्या गावांना व मोडकसागर धरणाच्या खालील गावनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचे नायब तहसीलदार वसंत चौधरी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.