Kalyan Water Cut: शहाड, कल्याणचा पाणी पुरवठा बंद, पाणी जपून वापरा!

Kalyan Water Problem News: पाणी पुरवठा या ना त्या कारणाने खंडीत होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे !
Kalyan Water Cut: शहाड, कल्याणचा पाणी पुरवठा बंद, पाणी जपून वापरा!
Updated on

kalyan Latets News: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची मोहिली जलशुद्धीकरण केंद्राची मुख्य जलवाहिनी सोमवारी रात्री दिडच्या सुमारास लिकेज झाली. या जलवाहिनी दुरुस्तीचे काम पालिका प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे.

यामुळे या वाहिनीवरील पाणी पुरवठा हा बंद करण्यात आला आहे. परिणामी शहाड व कल्याण पश्चिमचा पाणीपुरवठा हा बंद झाला आहे. वारंवार पाणी पुरवठा या ना त्या कारणाने खंडीत होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Kalyan Water Cut: शहाड, कल्याणचा पाणी पुरवठा बंद, पाणी जपून वापरा!
Water Supply Kalyan-Dombivli : गुरुवारी कल्याण डोंबिवली मधील पाणी पुरवठा बंद

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या उल्हास नदी काठच्या मोहिली येथील जलशुध्दीकरण केंद्राची कल्याण पश्चिमेतील शहाड, रामबाग, बिर्ला महाविद्यालय परिसर, जोशीबाग, मिलिंदनगर परिसराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी सोमवारी मध्यरात्री दीड च्या सुमारास लिकेज झाली.

या लिकेज दुरुस्तीचे काम हाती घ्यायचे असल्याने कल्याण पश्चिमेला केला जाणारा पाणी पुरवठा हा मध्यरात्रीपासून पाणी पुरवठा विभागाने बंद केला आहे. या मुख्य जलवाहिनी वरुन कल्याण पश्चिमेच्या भोईरवाडी, बिर्ला कॉलेज परिसर, शहाड, मिलिंदनगर, सह्याद्रीनगर, योगीधाम, सिंडीकेट, चिकणघर, कल्याण पूर्वेतील अशोकनगर, शिवाजीनगर आदि परिसराला सुमारे 20 दशलक्ष लीटर दररोज पाणी पुरवठा केला जातो.

Kalyan Water Cut: शहाड, कल्याणचा पाणी पुरवठा बंद, पाणी जपून वापरा!
Mumbai Water Cut: मुंबईतल्या 'या' भागात १२ तास पाणी बंद

जलवाहिनी लिकेज झाल्याने हजारो लिटर पाणी वाहून वाया गेले. वाहिनी लिकेज झाल्याची माहिती समजताच या वाहिनीवरील पाणी पुरवठा बंद करण्यात आला. पाणी पुरवठा विभागाकडून लिकेज दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

लिकेज दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आल्याने मंगळवारी सकाळी कल्याण पश्चिम, शहाड व कल्याण पूर्वचा काही भागात पाणी आले नाही. पाणी न येण्याची कोणतीही कल्पना नसल्याने सकाळी ऐन कामाच्या वेळेत पालिकेकडून पाणीच न आल्याने नागरिकांमध्ये नाराजी चे वातावरण होते.

सकाळी कामावर जाण्याची गडबड, मुलांची शाळेत जाण्याची धावपळ, त्यात सकाळच्या वेळेत पाणी न आल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली.

Kalyan Water Cut: शहाड, कल्याणचा पाणी पुरवठा बंद, पाणी जपून वापरा!
Nashik Water Cut : पश्‍चिम, सिडको विभागात बुधवारी पाणीपुरवठा बंद

गेल्या काही दिवसांपासून दुरुस्ती, अचानकचे तांत्रिक बिघाडमुळे पालिकेचा पाणी पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. गेल्या आठवड्यात कांबा येथील महावितरणच्या वीज वाहिनीत बिघाड झाल्याने मोहिली येथील उदंचन, जलशुध्दीकरण केंद्रांचा पाणी पुरवठा बंद पडला होता. पश्चिमेतील वसंत व्हॅली, आधारवाडी परिसरात काही दिवसापूर्वी पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. कल्याण, डोंबिवली शहरांच्या इतर भागांचा पाणी पुरवठा मात्र सुरळीत सुरू असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

Kalyan Water Cut: शहाड, कल्याणचा पाणी पुरवठा बंद, पाणी जपून वापरा!
Nashik Water Cut: पाणीकपातीला लोकसभा निवडणुकीचा अडसर; प्रशासनाची कोंडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.