मुंबई- गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईत पावसानं दमदार हजेरी लावली. सतत सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये तब्बल 51 हजार 685 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणीसाठा जमा झाला आहे. म्हणजेच 5168 कोटी लिटर पाण्याची वाढ झाली आह. हा पाणीसाठा 13 दिवस पुरेल इतका आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव असून, यापैकी पाच तलाव पालिकेचे आहेत, तर दोन तलाव हे राज्य सरकारच्या अखत्यारितील आहेत. मुंबईला दररोज सरासरी 3850 एमएलडी (385 कोटी लिटर) पाणीपुरवठा केला जातो. ही बाब लक्षात घेता दोन दिवसांत सुमारे 13 दिवसांच्या पाणीसाठ्याची पडली आहे.
4 जुलैला सर्व तलावांतील 1 लाख 9 हजार 7 दशलक्ष लिटर पाणीसाठा होता. तर, सोमवारी हाच साठा 1 लाख 60 हजार 698 दशलक्ष लिटरवर पोहोचला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा कमी आहे. गेल्या वर्षी 6 जुलै रोजी सातही तलावांचा एकूण पाणीसाठा हा 2 लाख 16 हजार 522 दशलक्ष लिटर होता. यंदाच्या तुलनेत 55 हजार 830 दशलक्ष लिटरने अधिक होता. तर 6 जुलै, 2018 रोजी तो 3 लाख 55 हजार 360 दशलक्ष लिटर इतका होता.
गेल्यावर्षी 12 जुलै, 2019 रोजी तुळशी तलाव पूर्ण भरून वाहू लागला होता. त्यानंतर 25 जुलै रोजी तानसा, 26 जुलै रोजी मोडक सागर, 31 जुलै रोजी विहार, 25 ऑगस्ट रोजी मध्य वैतरणा आणि 31 ऑगस्ट रोजी अप्पर वैतरणा तलाव भरून वाहू लागले होते.
धरणातील उपयुक्त पाणीसाठा (दशलक्ष लीटर)
तलाव - 4 जुलैचा पाणीसाठा- 6 जुलैचा पाणीसाठा - 48 तासांतील वाढ
अप्पर वैतरणा- वाढीची नोंद नाही
मोडकसागर- 24, 862-- 28,343-- 3481
तानसा-13,488--15,709- 2,221
मध्य वैतरणा-19,917- 21,847-1,930
भातसा- 42,060-80,268- 38,208
विहार- 6,169- 9,976- 3,807
तुळशी- 2510,-4,548- 2,038
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.