Palghar News: कुठे अवकाळीचा मारा तर कुठे सतत घामाच्या धारा; पाणी टंचाईची भीषण समस्या

परंतु गेली चार दिवसांपासून तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाचा मारा झाला आहे तर ऊन्हाच्या तडाख्याने घामाच्या धारा वाहत आहे अशी अवस्था झाली आहे.
Palghar News: कुठे अवकाळीचा मारा तर कुठे सतत घामाच्या धारा; पाणी टंचाईची भिषण समस्या
palghar water newssakal
Updated on

Palghar News: पालघर जिल्ह्यात जंगलपट्टी आणि डोंगर दर्याच्या मोखाडा तालुक्यात प्रतिवर्षी जोराची पर्जन्यवृष्टी होते. तर तितकीच पाणी टंचाई निर्माण होते. गतसालच्या तुलनेने यावर्षी भिषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

सुर्य तळपल्याने पारा  40  अंशाला भिडला आहे. त्यामुळे जलश्रोत आटले आहे. नदी, नाले, विहीरी आणि बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. परिणामी टंचाई ग्रस्त गाव पाड्यांची संख्या वाढु लागली आहे. परंतु गेली चार दिवसांपासून तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाचा मारा झाला आहे तर ऊन्हाच्या तडाख्याने घामाच्या धारा वाहत आहे अशी अवस्था झाली आहे. 

Palghar News: कुठे अवकाळीचा मारा तर कुठे सतत घामाच्या धारा; पाणी टंचाईची भिषण समस्या
Uday Samant: चार पावलं मागे आलो, याचा अर्थ भविष्यात...; नारायण राणेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सामंत काय म्हणाले?

तालुक्यात सुर्य तळपल्याने कधी नव्हे एव्हढीच उष्णता भडकली आहे. पारा  40  शी भिडला आहे. त्यामुळे तालुक्यातील जलश्रोत आटले आहेत. नदी, नाले, विहीरी आणि बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. परिणामी नळपाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत.

सध्यस्धितीत तालुक्यात  67  गावपाड्यांना  23  टॅंकरद्वारे पाणी पुरवठा शासनाकडून करण्यात येतो आहे. त्यामुळे  29  हजार  882  नागरीकांना आणि  9  हजार  164  जनावरे असे एकुण  39  हजार  46  जणांना दिलासा मिळाला आहे. त्यासाठी  12  हजार लिटर क्षमतेच्या सरकारी टॅंकरना  90  फेर्या माराव्या लागत आहे. 

Palghar News: कुठे अवकाळीचा मारा तर कुठे सतत घामाच्या धारा; पाणी टंचाईची भिषण समस्या
Palghar Loksabha: पालघरमध्ये चौरंगी लढतीची शक्यता? महायुतीचा तिढा सुटेना, बहुजन विकास आघाडीचा ऊमेदवार गुलदस्त्यात!

 गतसालच्या तुलनेने यावर्षी तालुक्यात भिषण पाणी टंचाई जाणवतं आहे. गतसाली संपुर्ण पाणी टंचाई काळात  73  गावपाड्यांना पाणी टंचाई ची झळ बसली होती. त्यावेळी  81  फेर्याद्वारे टॅंकर ने पाणी पुरवठा करण्यात आला होता. यंदा एप्रिल च्या पंधरवाड्यात टंचाई ग्रस्त गाव पाड्यांची संख्या  67  वर पोहोचली असुन  90  फेर्याद्वारे टॅंकर ने पाणी पुरवठा करावा लागतो आहे. यंदा ऊन्हाची तिव्रता वाढल्याने टंचाई ग्रस्त गाव पाड्यांची संख्या शंभरीला पोहोचणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सध्यस्धितीत तालुक्यात गेली चार दिवसांपासून प्रचंड ऊष्मा वाढला आहे. याच स्थितीत अवकाळी चा मारा काही भागात झाला आहे. मात्र, दुसरीकडे प्रचंड ऊन्हाच्या काहीलीने नागरीकांच्या  घामाच्या धारा वाहत आहेत.

Palghar News: कुठे अवकाळीचा मारा तर कुठे सतत घामाच्या धारा; पाणी टंचाईची भिषण समस्या
Palghar Lok Sabha 2024: पालघरमध्ये तिरंगी लढत शक्य! शिंदे गटापुढे पक्षांतर्गत मतभेदांचे आव्हान

जलश्रोत आटल्याने नागरीकांची पायपीट....

तालुक्यातील टंचाई साठी संवेदनशील असलेल्या आसे ग्रामपंचायती मधील गावपाड्यांना असलेल्या नळपाणीपुरवठा योजनेचा पाण्याचा श्रोत आटला आहे. त्यामुळे येथील नळपाणीपुरवठा योजना बंद पडली आहे. त्यामुळे येथील दापटी - 1, दापटी - 2, स्वामीनगर, आसे, आणि नावळ्याचापाडा या गावपाड्यांत भिषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. येथील नागरीकांना रणरणत्या उन्हात पाण्यासाठी पायपीट करावी लागते आहे. तर ऊंबरपाडा, रामडोह आणि काकडपाडा येथील विहीरी कोरड्या पडल्याने, तेथील नागरीकांना पाणी टंचाई चा सामना करावा लागतो आहे. येथील ग्रामपंचायती ने टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी पंचायत समिती कडे केली आहे. 

शासनाकडून जनावरांना ही दिलासा.....

शासनाने माणसी 30  लिटर पाणी हे प्रमाण ठरवले आहे. त्याच पध्तीने मोठ्या जनावरांना  35  लिटर, लहान जनावरांना  10  तर शेळी, मेंढी, डुक्कर आणि कोंबड्यांसाठी  3  लिटर पाणी असे प्रमाण निश्चित केले आहे. माणसांबरोबर जनावरांना देखील सरकारी टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने, ऊन्हाच्या काहीलीत जनावरांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

           दरम्यान, पाणी पुरवठ्याची मागणी केलेल्या  टंचाई ग्रस्त गाव पाड्यांना टॅंकरद्वारे पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात मंजुरी साठी पाठविण्यात आल्याची माहिती मोखाडा पंचायत समिती प्रशासनाने दिली आहे. 

Palghar News: कुठे अवकाळीचा मारा तर कुठे सतत घामाच्या धारा; पाणी टंचाईची भिषण समस्या
Palghar Crime: मायलेकी झोपलेल्या असताना अज्ञाताने केला प्राणघातक हल्ला!

आमच्या ग्रामपंचायत क्षेत्रात एका संस्थेने केलेल्या नळपाणीपुरवठा योजनेचा नदीतील, पाण्याचा श्रोत आटला आहे. त्यामुळे दापटी  1, दापटी  2, स्वामीनगर, आसे आणि नावळ्याचापाडा या गावपाड्यांचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे येथील महिलांना रणरणत्या उन्हात पाण्यासाठी पायपीट करावी लागते आहे. येथे तातडीने टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा अन्यथा आम्हाला रस्त्यावर ऊतरावे लागेल.

ईश्वर बांबरे, ग्रामस्थ आसे ग्रामपंचायत व श्रमजीवी संघटना, मोखाडा तालुका सचिव. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.