मुंबई : कुलाबा येथे ऑक्टोबर पर्यंतच्या पावसा पेक्षा जास्त पाऊस यंदा ऑगस्टच्या 10 तारखे पर्यंत पडला आहे. कुलाब्यात आज सकाळपर्यंत 2450.2 मि.मी पाऊस झाला असून सरासरीच्या तब्बल 106 टक्के पाऊस आता पर्यंत झाला आहे. तर,ऑगस्ट महिन्याच्या संपुर्ण कालावधीतील पडणारा पाऊस पहिल्या दिवसात झाला होता. सांताक्रुझ येथे सरासरीच्या 94 टक्क्यां पर्यंत पाऊस झाला आहे. पुढील तीन दिवस मुंबईसह कोकणात पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
मुंबईत यंदा पावसाळ्यात कमी दिवसात जास्त पाऊस झाला आहे.5 ऑगस्ट रोजी कुलाब्यात ऑगस्ट महिन्यातील आता पर्यंतचा सर्वाधिक 300 मि.मी हून अधिक पाऊस नोंदविण्यात आला होता. तर,संपुर्ण ऑगस्ट महिन्यात कुलाब्यात 585 मि.मी पाऊस होतो.तर,पहिल्या आठ दिवसातच या पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्यात आता पर्यंत कुलाबा येथे 6393.2 मि.मी पाऊस झाला आहे.तर,संपुर्ण मोसमात कुलाब्यात सरासरी 2292 मि.मी पाऊस होतो.तर,यंदा आता पर्यंत 2450.2 मि.मी पाऊस झाला आहे. सांताक्रुझ येथे संपुर्ण मोसमात 2668 मि.मी पाऊस होतो. तर,आता पर्यंत 2526.6 मि.मी म्हणजे सरासरीच्या 94.70 टक्के पाऊस झाला आहे. दहा वर्षाच्या पावसाच्या आकडेवारी नुसार ही सरासरी काढली जाते.
ऑगस्टच्या पहिल्या दिवसा पर्यंत कुलाब्यात 1802 मि.मी पाऊस झाला होता. तर,सांताक्रुुझ येथे 2461.1 मि.मी पाऊस झाला होता. महामुंबईत गेल्या तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा ओढ दिली आहे.अधून मधून मोठ्या सरी कोळतात. पण,आता पुन्हा मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज केंद्रीय वेधशाळेने वर्तवला आहे. त्यानंतर महामुंबईत पुन्हा पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज आहे.
--------------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.