Water Shortage Dombivli : पाणी द्या नाही तर विष प्यायची परवानगी द्या; नागरिकांचे लेखी निवेदन

खोणी ग्रामपंचायतीकडे नागरिकांचे लेखी निवेदन
Water Shortage Dombivli give us water or poison demand of people mumbai
Water Shortage Dombivli give us water or poison demand of people mumbaisakal
Updated on

डोंबिवली - गावात काही भागात पाणी येते तर काही भागातील नळ कोरडे खणखणीत पडले आहेत. रात्रभर जागून, या त्या नळांवर वणवण करून हंडा भर पाणी देखील पाणी मिळत नसल्याने खोणी वडवली गावातील नागरिक हतबल झाले आहेत. पाणी बिल येते मात्र पाणी मिळत नसल्यामुळे अपाणी द्या नाही तर विष प्राशन करायची परवानगी द्या असे लेखी निवेदन गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीला दिले आहे.

कल्याण ग्रामीण भागातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून खोणी ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. मात्र ग्रामपंचायत मधील अंतर्गत राजकीय वादामुळे सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी नळांवर भटकंती करावी लागत आहे. गावात जलवाहिन्या आहेत पण त्यातून काही भागाला पाणीच येत नाही. गावात वेगवेगळ्या भागात तीन सत्रात पाणी येते.

Water Shortage Dombivli give us water or poison demand of people mumbai
Water Supply : पुण्यातील पाणी पुरवठा विस्कळीत; नागरिक हैराण

वडवली गावातील नळांना पाणीच येत नसल्याने महिला दुसऱ्या भागात जाऊन अपाणी भरण्याचा प्रयत्न करतात. पण तेथील नागरिक त्यांना पाणी भरू देत नाही. रात्रभर वाट पाहुन देखील नळावर पाणी मिळत नसल्याने महिला संतप्त झाल्या आहेत. पाणी येत नाही पण पाणी बिल नियमितपणे येतात. पाणी बिल नियमित भरतात त्यांना तरी पाणी द्या, मशीन लावून पाणी खेचतात त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी येथील संतप्त ग्रामस्थांनी केली.

Water Shortage Dombivli give us water or poison demand of people mumbai
Mumbai : राज्यातील १२३ रेल्वे स्थानकांचा होणार पुर्नविकास; मुंबईतील २८ स्थानकांचा समावेश

पाणी बिल भरून देखील निवडक सदस्यांच्या प्रभागात नियमित पाणी आणि इतरांना वेगळा न्याय हा ग्रामपंचायतीकडून दिला जात आहे. मतदारांना किती वेळा गृहीत धरणार असा प्रश्न ग्राम सदस्यांनी उपस्थित केला आहे.

वारंवार पत्रव्यवहार आणि बैठकांमध्ये पाणी विषय घेऊन सुद्धा त्याकडे कानाडोळा केला जात असल्याने विष प्राशन करण्याची परवानगी मागण्याची वेळ आमच्यावर आली आहे. खोणी ग्रामपंचायतीच्या सदस्य जयश्री ठोंबरे आणि मुकुंद ठोंबरे यांनी पत्र लिहून आत्महत्या करण्यास परवानगी मागितली आहे.

सदस्यांचे हे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत प्रशासन याकडे कधी लक्ष देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यावर सध्या ग्रामपंचायत प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे आता ग्रामपंचायत प्रशासन सोमवारी काय भूमिका मांडते हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे.

"ग्रामपंचायतीकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रभागात नागरिकांना पाणी मिळत नाही. आंदोलन करून देखील त्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. तर आता आमची ग्रामपंचायतीकडे एकच मागणी आहे कि तुम्ही आम्हाला पाणी देऊ शकत नाही तर विष पिण्याची परवानगी द्या. "

- जयश्री महेश ठोंबरे, सदस्य , खोणी ग्रामपंचायत

"आम्हाला पाण्यासाठी नागरिक दररोज विचारणा करत आहेत. ग्रामपंचातीकडे विषय मांडला तरी ते दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे पाणी नाही देत ग्रामपंचायत किमान आम्हाला विष पिण्याची परवानगी तरी द्यावी. "

- मुकुंद ठोंबरे, सदस्य, खोणी ग्रामपंचाय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.