मुंबई - जलवाहिनीचे काम काम हाती घेण्यात येणार असल्याने ए, बी आणि ई या कुलाबा डोंगरी आणि भायखळा विभागातील काही परिसरात १७ जानेवारी सकाळी १० वाजता ते १८ जानेवारी सकाळी १० वाजेपर्यंत म्हणजे २४ तासांठी पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. तर जे. जे. रुग्णालय परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन पालिकेच्या जलविभागाने केले आहे. (Water Supply Colaba Dongri Bhaikala water supply will be closed for 24 hours on 17 and 18 January)
पालिकेच्या भायखळा ई विभागातील पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्याकरिता नवानगर, डॉकयार्ड रोड येथे असलेली जुनी १२०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनी बंद करुन त्या ठिकाणी नवीन १२०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी भंडारवाडा जलाशयाला जाणा-या जुन्या १२०० मि.मी. च्या जलवाहिनीवर जलद्वार बसविण्याचे काम बुधवार, १७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपासून ते गुरुवार, १८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपर्यंत एकूण २४ तासांसाठी हाती घेण्यात येणार आहे.
जलवाहिनी कामाच्या कालावधीत ए, बी आणि ई विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा २४ तास बंद राहणार आहे. तर जे. जे. रुग्णालय परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. (Latest Marathi News)
येथे पाणी पुरवठा बंद राहणार -
ए विभाग-
नेव्हल डॉकयार्ड सप्लाय - सेंट जॉर्ज हॉस्पिटल, पी. डिमेलो रोड, रामगड झोपडपट्टी, आर. बी आय., नेव्हल डॉकयार्ड, शहीद भगतसिंग मार्ग, जी. पी. ओ. जंक्शनपासून रिगल सिनेमापर्यंत २४ तासांसाठी पाणीपुरवठा पूर्णत बंद राहिल.
ई विभाग–
नेसबीट झोन - ना. म. जोशी मार्ग, मदनपुरा, कामाठीपुरा, एम. एस. अली मार्ग, एम. ए. मार्ग, आग्रीपाडा, टँक पाखाडी मार्ग, क्लेअर रोड, सोफिया जुबेर मार्ग, भायखळा (पश्चिम), म्हातारपाखाडी रोड, म्हातारपाखाडी मार्ग, सेंट मेरी रोड, नेसबीट रोड, ताडवाडी रेल्वे कुंपण येथील १८ जानेवारी रोजी तर डॉकयार्ड रोड झोन - बॅ. नाथ पै मार्ग, डिलिमा स्ट्रीट, गनपावडर रोड, कासार गल्ली, लोहारखाता, कॉपरस्मिथ मार्ग येथे १७ जानेवारी रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहिल. (Marathi Tajya Batmya)
जे. जे. रुग्णालय –
मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन - मुंबई पोर्ट ट्रस्ट, दारुखाना, रे रोड झोन - बॅ. नाथ पै मार्ग, मोदी कुंपण, ऍटलास मिल कुंपण, घोडपदेव छेद गल्ली क्रमांक १-३ येथे १७ जानेवारी रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार
बी विभाग -
बाबूला टँक झोन - मोहम्मद अली मार्ग, इब्राहिम रहिमत्तुला मार्ग, इमामवाडा मार्ग, इब्राहिम मर्चंट मार्ग, युसूफ मेहेर अली मार्ग, डोंगरी आदी भागात १८ जानेवारी रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहिल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.