Dombivli Flood: उल्हास नदीचे पाणी मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात घुसले; कल्याण पश्चिम, टिटवाळा, आंबिवली भागाचा पाणी पुरवठा बंद

Mumbai Latest News in Marathi |ठाणे व रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.
Water supply to Kalyan West Titwala Ambivali cut off due to Ulhas river water enters mohili water plant
Water supply to Kalyan West Titwala Ambivali cut off due to Ulhas river water enters mohili water plantSakal
Updated on

डोंबिवली - ठाणे व रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीने आपली इशारा पातळी ओलांडली आहे.

केडीएमसीच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्रामध्ये उल्हास नदीचे पाणी शिरल्यामुळे जलशुद्धीकरण केंद्र बंद करण्यात आलेले आहे. परिणामी कल्याण पश्चिम, टिटवाळा, आंबिवली परिसराचा पाणी पुरवठा बंद झाला असून नागरिकांचे हाल होत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे.

गुरुवारी सकाळी साडे सातच्या सुमारास बदलापुरातून उल्हास नदी इशारा पातळीवरून वाहत होती. बदलापुरात 16.50 मीटर इतकी नदीची इशारा पातळी आहे. तर 17.50 मीटर ही धोका पातळी आहे. जांभूळ आणि मोहने या दोन केंद्रांवरही उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली होती. त्यामुळे नदीकाठच्या शाळा बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

Water supply to Kalyan West Titwala Ambivali cut off due to Ulhas river water enters mohili water plant
Mumbai Rain Update : बारवी धरण 60 टक्के भरले; मुसळधार पावसाने पाणी पातळीत वाढ

बदलापूर सोबतच उल्हास नदीच्या जांभूळ बंधारा आणि मोहने येथील केंद्रावरही नदी इशारा पातळीवरून वाहत आहे. जांभूळ येथे इशारा पातळी 13 मीटर तर धोका पातळी 14 मीटर इतकी आहे. तर मोहन येथे इशारा पातळी 9 मीटर असून धोका पातळी 10 मीटर आहे. गुरुवारी सकाळी येथून उल्हास नदी 9 मीटरवरून वाहत होती.

मोहिली जलशुद्धीकरण केंद्रामध्ये उल्हास नदीचे पाणी शिरल्यामुळे जलशुद्धीकरण केंद्र सध्या बंद करण्यात आलेले असल्याची माहिती केडीएमसीच्या पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आले.

यामुळे पालिकेच्या अ प्रभागातील मांडा, टिटवाळा, उंबरणी, बल्याणी, आटाळी, आंबिवली, मोहने, वडवली आणि कल्याण पश्चिमेकडील काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर जलशुद्धीकरण केंद्र चालू करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल. अशी सूचना पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. अचानक पाणी पुरवठा बंद झाल्याने परिसरातील नागरिकांचे हाल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.