मुंबई - एकीकडे कोरोनाची दहशत, तर दुसरीकडे निसर्ग वादळाची धडकी. मुंबईकरांचा कालचा दिवस चांगलाच टेन्शनमध्ये गेला. एकतर या आधी कधीही मुंबईत चक्रीवादळ आलेलं नाही. अशात पहिल्यांदाच येणाऱ्या चक्रीवादळामुळे प्रशासन देखील सज्ज होतं. मुंबईत कोरोनानं थैमान घातलंय अशात निसर्ग चक्रीवादळ मुंबईत धडकलं असतं तर समुद्रकिनारी राहणाऱ्या घरांचं मोठं नुकसान झालं असतं. केवळ घरांचंच नाही तर अनेकांच्या जीवाला देखील धोका होता. मात्र निसर्ग चक्रीवादळाने मुंबईला चकवा देत उत्तर आणि ईशान्येकडे कूच केली.
कशी वाचली मुंबई :
काल दुपारी अपेक्षेप्रमाणे निसर्ग चक्रीवादळाचा लँडफॉल झाला. लँडफॉल म्हणजे समुद्रातून चक्रीवादळ भूभागावर धडकणे. धडकी भरवणारा सोसाट्याचा वादळी वारा, अनेक ठिकाणी घरांचे उडणारे छतं, मोठ्या प्रमाणात उन्मळून पडलेली झाडं आणि कैक ठिकाणी उखडून पडलेले विजेचे खांब. काहीसं असं होतं निसर्ग चक्रीवादळ धडकल्यानांतरचं चित्र.
या वादळाने मुंबईवर देखील आपला परिणाम दाखवला खरा. मात्र मुंबई निसर्गच्या विळख्यात पूर्णपणे येण्यातून थोडक्यात बचावली. मुंबईवरचा धोका टळल्यानंतर हवामान खात्याने मुंबई शहर निसर्गच्या विळख्यातून कसं वाचलं याचं कारण सांगितलं. हवामान खात्याच्या माहितीप्रमाणे निसर्ग चक्रीवादळ हे अपेक्षित जागेपेक्षा थोडं दक्षिणेतील जमिनीला धडकलं. चक्रीवादळ जमिनीला धडकलं की त्याची तीव्रता कमी होण्यास सुरवात होते. आणि हेच मुख्य कारण होतं मुंबई शहर वाचण्याचं. अलिबाग आणि रायगड भागात निसर्गाचा मोठा कहर पाहायला मिळाला. यानंतर निसर्ग चक्रीवादळाने आपली दिशा देखील बदलली आणि पनवेल, कल्याण मार्गे पुढे उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने कूच केली आणि यामुळे मुंबई वाचली.
मोठी बातमी - यंदाच्या पावसाळ्यातील 'हे' २४ दिवस आहेत धोक्याचे...
'निसर्ग'साठीही मुंबई मुंबई होती सज्ज :
निसर्ग वादळ थेट मुंबईत धडकलं नसलं तरीही वादळाच्या प्रभावामुळे मुंबईत जोरदार वादळी वारे अनुभवायला मिळाले. या वाऱ्यांमुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात झाडं उन्मळून पडलेली पाहायला मिळाली. निसर्गच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अनेकांना शेल्टर होम्स म्हणजेच तात्पुरत्या निवाऱ्यात हलवण्यात आलेलं.
weather department clears why and how nisarga cyclone did not hit mumbai
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.