CET: अकरावी प्रवेशासाठी शिक्षण विभागाची वेबसाईट बंदच, विद्यार्थी प्रतीक्षेत

Student
Studentsakal media
Updated on

मुंबई : अकरावी प्रवेशासाठी (Eleventh Admission) शालेय शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आलेली वेबसाईट( Website) मागील चार दिवसांपासून बंद असल्याने त्याचा मोठा मन:स्ताप राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना (Students) सोसावा लागत आहे. त्यातच पुढील दोन दिवस या वेबसाइट संदर्भात कामकाज सुरू होणार असल्याने अकरावी सीईटीसाठी नोंदणी (CET) करणाऱ्या विद्यार्थ्यांना तोपर्यंत वाट पहावी लागणार आहे. ( Website is under working for eleventh Admission CET students on waiting-nss91)

अकरावी सीईटीच्या वेबसाईट संदर्भात कामकाज सुरू आहे, पुढील दोन दिवसात ही वेबसाइट पूर्ण तयारीनिशी सुरू केली जाईल आणि या दरम्यान जो वेळ वाया गेला त्यासाठीची भरपाई म्हणून विद्यार्थ्यांना 26 जुलै ऐवजी पुढील काही दिवसांची मुदत दिली जाईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी ' सकाळ ' शी बोलताना दिली.

Student
वीज कायद्याविरोधात कामगार संघटना बेमुदत संपाचं हत्यार उपासणार!

शालेय शिक्षण विभागाने सुरू केलेल्या सीईटीच्या वेबसाईटवर 20 जुलैपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे मात्र पहिल्या दिवसापासूनच ही वेबसाईट चालत नसल्याने लाखो विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला आहे. त्यातच मागील चार दिवसांपासून हे संकेतस्थळ पूर्णपणे बंद असल्याने पहिल्या आणि दुसर्‍या दिवशी दीड लाखांच्या दरम्यान विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी पूर्ण केली. त्यानंतर आता असंख्य विद्यार्थ्यांना ही नोंदणी पूर्ण करता आली नाही.त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी ही वेबसाईट केव्हा सुरू होईल याची वाट पाहत आहेत.

दरम्यान, शालेय शिक्षण विभागाने अकरावीच्या सीईटी संदर्भात कोणतीही तयारी न करता त्यासाठीची वेबसाइट सुरू केली होती. यामुळे शिक्षण विभागाची फजिती झाली असल्याचा आरोप काही शिक्षण तज्ज्ञांकडून केला जात आहे. तर दुसरीकडे या संदर्भात असलेले सर्व कामकाज एका खासगी कंपनीला दिले जाणार असल्याने त्यासाठीच्या या चढाओढीत हा सर्व गोंधळ निर्माण झाला असल्याची माहिती शिक्षण विभागातील एका उच्चस्तरीय अधिकारी सूत्रांनी दिली.

Student
रेल्वेचा मान्सूनपूर्व कामांचा दावा फोल, घाटात रेल्वेचे नुकसान

सीईटीसाठी अनेक कंपन्या उत्सुक

राज्य शिक्षण मंडळाने सुरू केलेल्या सीईटीच्या नोंदणीचे वेबसाईट चालत नसल्याने यावर उपाय म्हणून मंडळाकडून विविध खाजगी कंपन्यांना यासाठीचे कामकाज दिले जाणार आहे. त्यासाठी मंत्रालयातून काही कंपन्यांची नावे सुचविण्यात आली आहेत. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी पुण्यात काही ठराविक कंपन्यांकडून त्यांच्या कामकाजाची माहिती आणि त्यासोबत त्यांचे प्रेझेंटेशन घेण्यात आले असल्याची माहिती अधिकारी सूत्रांकडून देण्यात आली

सीईटी’चे असे होते नियोजन

अकरावी सीईटीसाठी 19 जुलैला अर्ज प्रक्रिया सुरू केली जाणार होती. परंतु काही अडचणींमुळे मंडळाने 20 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता आपली वेबसाईट सुरू केली. पहिल्याच दिवशी ती चालत नसल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यात सीईटीसाठी नोंदणी करण्याची अखेरची मुदत 26 जुलैपर्यंत देण्यात आली होती. मात्र मागील चार दिवसांपासून नोंदणीसाठीची वेबसाईट बंद असल्याने त्यासाठीची मुदत वाढवून द्यावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.