शाब्बास! धारावीतील संसर्ग नियंत्रणात आणल्यामुळे WHO कडून कौतुकाची थाप

शाब्बास! धारावीतील संसर्ग नियंत्रणात आणल्यामुळे WHO कडून कौतुकाची थाप
Updated on

मुंबई – जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे थैमान वाढतच आहे. या संसर्गावर बड्या विकसित देशांनाही नियंत्रण मिळवता आलेले नाही. आपल्या देशातही कोरोना संसर्गाचा आकडा दररोज विक्रम गाठत आहे. राज्यातही काही वेगळी परिस्थिती नाही. परंतु कोरोना संसर्ग नियंत्रित करता येतो याचे उत्तम उदाहरण मुंबईच्या धारावी वस्तीने दाखवून दिले आहे.

धारावी हा सर्वात मोठा झोपडपट्टी परिसर आहे. या ठिकाणी अतिशय दाटीवाटीत असलेल्या घरांमुळे कोरोनाचा संसर्ग अनियंत्रित पद्धतीने वाढत होता. राज्य सरकार आणि मुंबई महानगर पालिकेने धारावीतील संसर्ग नियंणात आणण्यासाठी कंबर कसली . मोठ्या प्रमाणावर यंत्रणा धारावीत कार्यरत झाली. त्याचा परिणाम म्हणून धारावीचा संसर्ग आता नियंत्रणात आला आहे. धारावीचा संसर्ग नियंत्रणात आल्याने या मॉडेलचे कौतुक थेट जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.

मुंबईतील धारावी परिसर ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. अशा कठीण परिसरात कोरोना नियंत्रण आणता येऊ शकतो. हे धारावी मॉडेलने दाखवून दिले आहे. या कामाचे कौतुक करताना जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी म्हटले आहे की, ‘केवळ राष्ट्रीय एकात्मता आणि जागतिक ऐक्यातून या या साथीला प्रतिबंध केला जाऊ शकतो’. जागतिक महामारीच्या परिस्थितही अशी उदाहरणे आपल्याला यातून बाहेर पडण्यासाठी प्रेरणा देऊ शकतात.

कोरोनाच्या भीतीने मानसिक रुग्णांची परवड; मुंबईतील रुग्णालयांच्या मानसोपचार विभागांची नेमकी परिस्थिती काय?
 

कोरोनाच्या साथीला नियंत्रित करण्यासाठी सर्व नागरिकांनी चळवळ उभी करणे, चाचण्या करणे, रुग्णांचा शोध घेणे, त्याचे अलगिकरण करणे, रुग्णांवर योग्य उपचार करणे हे गरजेचे आहे. नियमांचेही काटेकोर पालन केल्यास कोरोनाची साखळी तोडता येऊ शकते. असंही त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलंय जागतिक आरोग्य संघटनेने

मुंबई शहरात कोरोनाचे थैमान अद्यापही सुरूच आहे. परंतु मुंबईतील कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट बनू पाहणाऱ्या धारावीने करोना चाचणी, रुग्णांचा शोध घेणं, सोशल डिस्टन्सिंग आणि संसर्ग झालेल्या रुग्णांवर त्वरित उपचार केल्यामुळे करोनाविरोधातील लढाईत यश मिळताना दिसत आहे. याच पद्धतींचा वापर केल्याने काही देशांमध्ये कोरोना नियंत्रणात आला आहे. परंतु अशा देशांमध्ये आता पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘या संसर्गाला आळा घालायचा असेल तर, समाजातील सर्वाचा सहभाग, नेतृत्व आणि सामूहिक एकता आवश्यक आहे’. असे गेब्रयेसुस यांनी म्हटले आहे.

धारावीत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर अनेक तज्ज्ञांनी याबाबत चिंता व्यक्त केली होती. कारण कोरोना सारखी साथ दाट लोकवस्तीत मोठ्या प्रमाणात थैमान घालू शकते हे अपेक्षित होतं. सुरूवातीच्या काही दिवसांमध्ये धारावीतील कोरोना योद्धांनाही लागण होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे अशा भागात कोरोना नियंत्रणात आणायचा कसा हा मोठा प्रश्न बनला होता. परंतु त्यानंतर प्रशासणाने गतिमान पावले उचलली आणि गेल्य़ा काही दिवसांपासून धारावीत कोरोना रुग्णांची संख्या शुन्यावर आली आहे.

धारावीत असलेल्या सामूहिक शौचालयाच्या समस्या दूर करण्यात आला. दाट लोकसंख्येमुळे विलगीकरणाच्या वेगळ्या व्यवस्था करण्यात आल्या. धारावीत कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्या. यामुळे धारावीतील रुग्णांना लवकरात लवकर शोधता आले. आणि धारावी नियंत्रणात आली असे म्हणता येईल. त्यामुळेच धारावी मॉडेलचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.