दादरच्या शिवाजी पार्क मैदानात सापडल्या गोड्या पाण्याच्या विहिरी

कशा सापडल्या या विहिरी?
दादरच्या शिवाजी पार्क मैदानात सापडल्या गोड्या पाण्याच्या विहिरी
Updated on

मुंबई: समुद्रापासून अवघ्या काही पावलांवर असलेल्या दादरच्या शिवाजी पार्क (dadar shivaji park) मैदानात गोड्या पाण्याचे स्त्रोत सापडले आहेत. शिवाजी पार्क मैदानाच्या नूतनीकरणाचा प्रकल्प लवकरच सुरु होणार आहे. त्याआधी इथे ३५ विहिरी खोदण्यात (wells found) आल्या. त्यात पाच विहिरींमध्ये गोडे पाणी लागले आहे. खरंतर समुद्राच्या अत्यंत जवळ असलेल्या या मैदानात गोडं पाणी लागणं एक वेगळी गोष्ट आहे. (wells found in dadar shivaji park area)

दादर-शिवाजी पार्क भागात अनेक जुन्या विहिरी होत्या. त्या नंतर बुजवण्यात आल्या. शिवाजी पार्क मैदानाच्या नूतनीकरणाच्या दृष्टीने काम सुरु असताना या विहिरी आढळल्या आहेत. भूगर्भशास्त्रज्ञांनी प्लॅटिनम रॉडच्या सहाय्याने या गोड्या पाण्याच्या विहिरी शोधून काढल्या. हे प्लॅटिनम रॉड समान अंतरावर पकडल्यानंतर जिथे पाणी नाहीय, त्या ठिकाणी हे रॉड परस्परांपासून लांब जातात आणि जिथे भूगर्भात पाणी आहे, तिथे हे रॉड जवळ येतात, अशा पद्धतीने शिवाजी पार्कमध्ये या गोड्या पाण्याच्या विहिरी शोधण्यात आल्या.

दादरच्या शिवाजी पार्क मैदानात सापडल्या गोड्या पाण्याच्या विहिरी
BMC थेट रेड्डीजकडून लस का घेत नाही? मधले दलाल कशासाठी - मनसे

"माहिमपासून वरळीपर्यंत आणि समुद्रापासून सावरकर मार्गापर्यंत वालूकामय भाग आहे. इथे गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. ओशियाना अपार्टमेन्ट, मधुवती, कोहिनूर स्कवेअर इथे गोड्या पाण्याच्या विहिरी होत्या. त्यामुळे शिवाजी पार्क मैदानातही गोड्या पाण्याची विहिर लागणार याची खात्री होती" असे भूगर्भशास्त्रज्ञांनी सांगितले.

दादरच्या शिवाजी पार्क मैदानात सापडल्या गोड्या पाण्याच्या विहिरी
पोलिसाने बाईक अडवून सोन्याने भरलेली बॅग ताब्यात घेतली आणि त्यानंतर...

आजच्या घडली प्रत्येक विहिरीत १.५० लाख लिटर पाणी आहे, असे भूगर्भ शास्त्रज्ञांनी सांगितले. शिवाजी पार्क मैदानात क्रिकेट खेळलं जातं. अनेक क्रीडा प्रकार इथे शिकवले जातात. दरम्यान मधल्याकाळात या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना धुळीचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत होता. टीबीचे रुग्णही या भागात वाढले होते. त्यामुळे शिवाजी पार्क मैदानाच्या नूतनीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला. शिवाजी पार्क मैदान अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक जीवनात या मैदानाचे एक वेगळे महत्त्व आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.