Western Line Mega Block: गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबईकरांचा खोळंबा! वेस्टर्न लाईनवर तब्बल 35 दिवसांचा मेगा ब्लॉक

Western Line 35 Days Mega Block: सहाव्या रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणाच्या या कामात 4.75 किमी लांबीच्या बांधकामाचा समावेश आहेत. दरम्यान गोणेशो गणेशोत्सव तोंडावर असताना हा निर्णय घेतल्यामुळे मुंबईकरांमध्ये नाराजी आहे.
Western Line 35 Days Mega Block
Western Line 35 Days Mega BlockEsakal
Updated on

गोरेगाव आणि कांदिवली दरम्यानच्या सहाव्या रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी वेस्टर्न लाईनवर ऑगस्टच्या अखेरीस 35 दिवसांच्या मेगाब्लॉक सुरू होणार आहे. यामुळे तब्बल 650 ते 700 ट्रेन सेवा रद्द केल्या जाणार आहेत. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना आता पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

सहाव्या रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणाच्या या कामात 4.75 किमी लांबीच्या बांधकामाचा समावेश आहेत. दरम्यान गणेशोत्सव तोंडावर असताना हा निर्णय घेतल्यामुळे मुंबईकरांमध्ये नाराजी आहे. असे असले तरी 10 दिवसांच्या गणेशोत्सव उत्सवादरम्यान हे काम थांबवले जाईल असे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याचे वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिली आहे.

मेगा ब्लॉक 27/28 ऑगस्टच्या रात्री सुरू होणार असून विस्तारीकरणाचे हे काम पाच आठवड्यांपर्यंत सुरू राहील. (Western Line 35 Days Mega Block)

पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, "मेगा ब्लॉक प्रामुख्याने आठवड्याच्या शेवटी होईल, 10-तासांचे ब्लॉक्स रात्रीच्या वेळी पाच वेगवेगळ्या वेळेला असतील. या ब्लॉक्स दरम्यान प्रत्येक रात्री सुमारे 130-140 ट्रेन सेवा रद्द होण्याची अपेक्षा आहे. आठवड्याच्या दिवशी, ब्लॉक्स लहान असतील, ते रात्री पाच तासांपर्यंत चालतील, परिणामी कमी गाड्या रद्द होतील.“

विशेष म्हणजे 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी कोणतेही काम केले जाणार नाही. रात्रीचे ब्लॉक सामान्यतः विशिष्ट दिवसानुसार रात्री 10-11 च्या दरम्यान सुरू होतील.

कामाच्या 5व्या, 12व्या, 16व्या, 23व्या आणि 30व्या दिवसांसाठी पाच प्रमुख 10 तासांच्या ब्लॉक्सचे नियोजन करण्यात आले आहे. 7 सप्टेंबर रोजी रात्रीचा ब्लॉक वगळता, 7-17 सप्टेंबर दरम्यान कोणतेही ब्लॉक शेड्यूल केलेले नाहीत.

Western Line 35 Days Mega Block
Dahi Handi 2024: महाराष्ट्रातील या गावात विहिरीच्या मध्यभागी दहीहंडी बांधण्याची अनोखी परंपरा, पहा Video

नोव्हेंबर 2023 मध्ये, पश्चिम रेल्वेने सांताक्रूझ-गोरेगाव कॉरिडॉरवरील या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण केला होता. गोरेगाव आणि कांदिवली विभागात सुधारणा करण्यासाठी हा विस्तार कायम राहणार आहे.

हा प्रकल्प 2008 मध्ये सुरू झाला असून, तो डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. बांधकाम कामामुळे होणारी गैरसोय असूनही, प्रवासी लवकरच अधिक कार्यक्षम रेल्वे नेटवर्कची अपेक्षा करू शकतील.

Western Line 35 Days Mega Block
Government Employee: आणखी एक गुड न्यूज! अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये वाढ; प्रशासकीय मंजुरीही मिळाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.