पश्‍चिम मुंबई आरटीओची महसुलाची रग्गड कमाई; तिसऱ्या क्रमांकावर झेप

RTO News Update
RTO News Updatesakal media
Updated on

मुंबई : राज्य परिवहन विभागाकडून (Regional transport office) दर आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या उद्दिष्टामध्ये १०० टक्के महसूल मिळवणाऱ्या (Revenue income) पहिल्या तीन क्रमांकांमध्ये पश्चिम मुंबई (western Mumbai) आरटीओने बाजी मारली आहे. पहिल्या क्रमांकावर पुणे, दुसऱ्या स्थानी पिंपरी-चिंचवड, तिसऱ्या क्रमांकावर पश्‍चिम मुंबई आणि चौथ्या स्थानावर ठाणे आरटीओ (Thane RTO) कार्यालयाने १०० टक्क्यांपेक्षा जास्त महसुलाची रग्गड कमाई केली आहे.

RTO News Update
टेम्पोच्या धडकेत वाहतूक पोलिस जखमी; टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल

वाहनांसंबंधी कामांमधून गेल्या आर्थिक वर्षात तब्बल एक हजार २७ कोटींपेक्षा अधिक महसूल मिळवून राज्यात पुणे आरटीओ अव्वल ठरले आहे. राज्यातील सुमारे ५० आरटीओ कार्यालयांनी उद्दिष्ट पूर्ण केले नसल्याचे दिसून येत आहे. परिवहन विभागाचा महसूल वाढवण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने यापूर्वीच सर्व आरटीओ कार्यालयांना वायू पथकाच्या कारवाईसाठी एकूण ७६ अत्याधुनिक वाहने दिली आहेत. त्यामुळे वायुवेग पथकाची दंडात्मक कारवाई वाढल्याने वाहनांवरील कारवाईस आणि थकीत करवसुलीस वेग आला आहे.

११५ टक्क्यांचे उद्दिष्ट पूर्ण

२०२०-२१ मध्ये पश्‍चिम मुंबई आरटीओ कार्यालयाला ३४३.३१ कोटींच्या महसुलाचे लक्ष्यांक होते. त्यापैकी ९०.९३ टक्के म्हणजेच ३१२.१८ कोटींच्याच महसुलाची कमाई झाली. त्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षात आरटीओ भरत कळसकर यांच्या प्रयत्नाने ४३४.९८ कोटींचे महसुलाचे लक्ष्यांक असताना तब्बल ५००.३४ कोटींचा महसूल मिळवत ११५.३ टक्क्यांनी अधिक कमाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.