मुंबई - पश्चिम रेल्वेने विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडण्यासाठी एप्रिल महिन्यात विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले आहे. या अभियानांतर्गत पश्चिम रेल्वेने एका महिन्यात २ लाख ९४ हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून २० कोटी ८४ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. मुंबई विभागातील विना तिकिट प्रवाशांकडून ५ कोटी ५७ लाख रुपये दंड आकारण्यात आला.
विना तिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे उपनगरीय, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये तीव्र तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकाने एप्रिल महिन्यात २ लाख ९४ हजार विना तिकिट प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून २० कोटी ८४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
मुंबईच्या उपनगरीय लोकल मार्गावर ९८ हजार विना तिकिट प्रवाशांकडून ५ कोटी ५७ लाखांचा दंड आकारण्यात आला. याशिवाय एसी लोकलमध्येही मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत ४ हजारांपेक्षा जास्त विना तिकिट प्रवासी आढळले. त्यांच्याकडून १३ लाख ७१ हजारांचा दंड वसूल केला.
रात्रीच्या वेळी तिकिट तपासण्यासाठी पश्चिम रेल्वेने खास बॅटमॅन पथक तयार केले आहे. या पथकाने ३ एप्रिल आणि ४ मे रोजी रात्री विना तिकिट प्रवाशांकडून ३ लाख ४० हजारांचा दंड वसुल केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.