भंगार विक्री करुन पश्चिम रेल्वेचा विक्रम, जमवला १०० कोटींचा गल्ला!

western railway
western railwaysakal media
Updated on

मुंबई : भारतीय रेल्वेमध्ये (Indian railway) ‘शून्य भंगार मोहिम' सुरू आहे. या मोहिमेतंर्गत रेल्वेच्या सर्व विभागातील भंगाराची विक्री (old material sales) करून उत्पन्न मिळविले जाते. यासह भंगारामुळे अस्वच्छ दिसणारा परिसर स्वच्छ करण्यात आणि भंगारात अडविली जाणारी जागा इतर कामासाठी वापरण्यात येते. त्यामुळे भारतीय रेल्वेमध्ये ही मोहिम जोरदार सुरू आहे. या मोहिमेत भारतीय रेल्वेतील सर्व विभागापैकी सर्वाधिक म्हणजे 100 कोटी रुपयांची भंगार विक्री ( 100 Crore income) पश्चिम रेल्वेने (western railway) केली. त्यामुळे पश्चिम रेल्वेने यंदा भंगार विकून नवा विक्रम (new record) नोंदविला आहे. लोह, स्टील, अ‍ॅल्युमिनियम, पितळ, तांबे व इतर धातूच्या भंगाराची विक्री केली आहे. यासह जुने डबे, माल डबे, रेल्वे इंजिन, चाके यांची विक्री केली. ( Western railway earned hundred crore income sailing old matarial-nss91)

western railway
आरोग्य सेविकांनी खात्री केल्यानंतरच लसीकरण, महापौरांची माहिती

पश्चिम रेल्वे प्रशासनाने चालू आर्थिक वर्षात रेल्वे परिसरातील भंगार विकून 100 कोटींची कमाई केली आहे. पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल आणि मुख्य सामग्री व्यवस्थापक डी.के. श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम रेल्वेच्या सामग्री प्रबंधन विभागाने ही कार्यवाही केली. या मोहिमेतंर्गत 2019-2020 या आर्थिक वर्षात 533 आणि 2018-19 या वर्षात भंगार विकून 537 कोटी रुपये कमविले होते. तर, 2020-21 या लॉकडाऊन काळात देखील 491.04 कोटींचे भंगार विकले. पश्चिम रेल्वेने चालू आर्थिक वर्षात 2021-22 मध्ये 30 जुलैपर्यंत 100 कोटी रुपयांची भंगार विक्री केली आहे.

कोरोना महामारीच्या कठिण परिस्थितीत पश्चिम रेल्वेने 2020-21 आर्थिक वर्षात भंगार विक्री करून 410 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले. तर, संपूर्ण 2020-21 या वर्षात 491.04 कोटी रुपयांची भंगाराची विक्री केली. भारतीय रेल्वेमधील सर्व विभागामध्ये सर्वाधिक भंगार विक्री पश्चिम रेल्वेने केली आहे. मागील तीन वर्षांपासून पश्चिम रेल्वे सलग 500 कोटी रुपये भंगार विक्री करण्यात यश मिळवित आहे. यावर्षाच्या मार्चपासून शून्य भंगार मोहिमेत पश्चिम रेल्वेने 100 कोटी रुपयांचे लक्ष्य साध्य करून विक्रम केला आहे. ही मोहिम अशीच सुरू ठेवून पश्चिम रेल्वेच्या सर्व विभागातील, वर्कशाॅपमधील ठिकाणे 100 टक्के भंगार मुक्त करण्यात येणार आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.