Western Railway News: सुरक्षा आणि ऑपरेशनल कार्यक्षमतेत सुधारणेसाठी स्वदेशी विकसित ‘कवच’ ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन प्रणालीचा वापर केला आहे. या यंत्रणेच्या ५०३ किमी अंतरावर लोको चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्या असून ९० पैकी ७३ लोकोमोटिव्ह कवच प्रणालीने सज्ज आहेत.
पश्चिम रेल्वेच्या ७८९ किलोमीटर लांबीच्या मार्गावर ही यंत्रणा वापरली जाणार आहे.
यात वडोदरा-अहमदाबाद आणि मुंबई सेंट्रल-नागदा विभागांचा समावेश आहे. उर्वरित काम चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस पूर्ण करण्याचे पश्चिम रेल्वेचे उद्दिष्ट आहे. अहमदाबाद, राजकोट आणि रतलाम विभागांतील १,५६९ किमी लांबीच्या मार्गासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. यापैकी ८३६ किमीचे काम अंतिम टप्प्यात आहे. रेल्वे सिग्नल्स, लेव्हल क्रॉसिंग गेट्स इत्यादींच्या अचूक स्थानासाठी लाइट डिटेक्शन आणि रेजिंग सर्वेक्षणही करण्यात आले आहे.