खेकड्यांच्या पाच नव्या प्रजातींचा शोध; तेजस ठाकरे यांचा सहभाग

Crab new species
Crab new speciessakal media
Updated on

मुंबई : पश्चिम घाटात (Western side) सापडणाऱ्या गोड्या पाण्यातील खेकड्यांच्या (crabs) पाच नव्या प्रजातींचा (five new species) शोध लावण्यात आला आहे. फ्रान्सने नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री मध्ये प्रकाशित केलेल्या पीअर-रिव्ह्यू वैज्ञानिक जर्नल झूसिस्टेमामध्ये याबाबतचा प्रबंध प्रकाशित झाल्याची माहिती या उपक्रमात सहभागी असलेले तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांनी दिली आहे.

Crab new species
एमडीआर क्षयाचा खात्मा करणार औषधांचा कॉम्बो; 100 रुग्णांवर चाचणी

नवीन शोध लावण्यात आलेल्या पाच प्रजातींपैकी 4 प्रजाती महाराष्ट्रातील आहेत, तर घाटियाना रौक्सी ही प्रजाती गोवा आणि कर्नाटकातील मूठभर परिसरात आढळते. या प्रजातीचे 'घाटियाना दुर्रेली एसपी' नामकरण करण्यात आले. तेजस ठाकरे यांनी हा प्रबंध 2015 मध्ये सुरू झालेल्या झेडएसआय चे डॉ.एस.के.पाटी यांच्याबरोबर तयार केला असून हे एकत्र तिसरे प्रकाशन आहे.

सह्याद्रीतील कोयना आणि अंबा घाटावर ब्रिटिश निसर्गवादी जेराल्ड मालकॉम ड्यूरेल या संवर्धनवादी संशोधकांने ही कामगिरी केली होती. ड्यूरेल याने वन्यजीव संवर्धन ट्रस्टच्या माध्यमातून, जगभरात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींसाठी संवर्धन कार्यक्रम सुरू केले. 1940 च्या दशकात जिवंत प्रजाती देखील गोळा करून जर्सी प्राणीसंग्रहालयात परत आणले, ज्याचे आजपर्यंत संवर्धन आणि प्रजनन कार्यक्रम सुरू आहे. आसाम मध्ये सापाडणाऱ्या काही दुर्मिळ प्रजाती देखील त्याच्या प्रयत्नांमुळेच बघायला मिळत आहेत.

"गेराल्ड माल्कॉम ड्यूरेल यांच्या नावावर प्रजातीचे नाव देण्याची संधी मिळणे हा सन्मान आहे.त्यांचे कार्य माझ्यासाठी खूप प्रेरणास्त्रोत आहे."

-तेजस ठाकरे

असे केले खेकड्यांचे नामकरण

सह्याद्रीयाना केशरी

सह्याद्रीयाना ताम्हिणी

सह्याद्रीयाना इनोपिनाटा

घाटीयाना रॉक्सी

घाटीयाना दुर्रेली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.