Ram Satpute vs NCP : महाराष्ट्राचे अधिवेशन चांगलेच तापले आहे. आज भाजपचे आमदार रास सातपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक झाले.
विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ देखील जाग्यावरुन उठून अध्यक्षांना कारवाई करण्याची मागणी केली. मात्र राम सातपुते असं काय म्हणाले की राष्ट्रवादीचे आमदार संतापले.
राम सातपुते म्हणाले, "जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्मावर चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केले. यावर मी आक्षेप घेतला. बाबासाहेबांनी आरक्षण दिलं नसत मला चाकरी करावी लागली असती, तुम्ही मागासवर्गीय जिल्ह्यातून निवडून येता. असे आव्हाड म्हणाले होते."
यावर राम सातपुते संतापले म्हणाले, "मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण दिले म्हणून मी विधानसभेत निवडून आलो, मला राष्ट्रवादीच्या शरद पवाराने आरक्षण दिले नाही".
राम सातपुतेंच्या या वक्तव्यानंतर विधानसभेत गोंधळ उडाला. विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ यांनी या वक्तव्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर राम सातपुते यांनी माफी मागितली.
अजित पवार आक्रमक! शेलारांनी देखील मागितली माफी -
अजित पवार म्हणावे, असे पायंडे पडणार असतील तर आमच्या बाजूने देखील वरीष्ठ नेत्यांबाबत वेगळ्या प्रकारची वाक्यरचना करण्यात येईल. माफी मागितली जाणार नाही, आम्ही म्हणू तापासा असेल तर तपासा आणि रेकॉर्डवरून काढायचं असेल तर काढा.
यावेळी अजित पवार यांनी अध्यक्षांना हात जोडून विनंती केली. आम्ही जसा वरिष्ठांचा आदर करतो तसा त्यांनी देखील आमच्या नेत्यांचा आदर केला पाहीजे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शरद पवारांचे कौतुक केले आहे. त्यामुळे सभागृहात शरद पवार यांचा एकेरी उल्लेख योग्य नाही, या प्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली.
यावेळी आशिष शेलार म्हणाले शरद पवार यांचा एकेरी उल्लेख, अपमान आम्हाला मान्य नाही. यावेळी आशिष शेलार यांनी माफी मागितली. तसेच त्यांनी राम सातपुते यांना माफी मागण्याची विनंती केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.