कुशल पंजाबी. लक्ष, काल, धन धना धन, गोल यासारख्या हिंदी सिमेमामध्ये काम केलंय. याचबरोबर कुशल यांनी अनेक हिंदी मालिकांमध्ये देखील काम केलंय. मात्र कुशल बाबतीत समोर आलेली बातमी मन सुन्न करणारी ठरली.
कुशल ने उचललेल्या टोकाच्या पावलानंतर आता याबाबत काही घटना समोर येताना पाहायला मिळताय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आता या घटनेबाबत अधिक उलगडा होताना दिसतोय. कुशल यानी टोकाचं पाऊल उचलण्यआधी काही दिवस कुणाचेच फोन उचलले नव्हते. कुशलच्या घरच्यांनी देखील त्याच्याशी संपर्क साधण्याचा संपर्क केला होता. मात्र त्यांच्याशी देखील कुशलने कोणताच संपर्क केलेला नव्हता. आणि म्हणूनच त्याचा घरच्यांनी कुशलकडे जाण्याचा निर्णय घेतला.
मोठी बातमी : महाविकास आघाडीच्या संभाव्य मंत्र्यांची नावे आली समोर
काही सूत्रांच्या माहितीनुसार कुशलच्या घराचे साधारण साडे दहा च्या सुमारास त्याच्या घरी पोहोचले. त्यांच्याकडे असणाऱ्या अतिरिक्त चावीने त्यांनी दहा पन्नासला कुशालच्या घराचा दरवाजा उघडला. आत जाताच त्यांना कुशलने स्वतःला टांगून घेतलेलं पाहिलं.
शेजाऱ्यांकडून पोलिसांना सदर घटना सकाळी अकरा दहा च्या सुमारास समजली. यानंतर पोलिसांकडून कुशलला तातडीने दवाखान्यात नेण्यात आलं. मात्र त्यानंतर डॉक्टरांनी कुशल पंजाबीला मृत घोषित केलं. यानंतर पोलिसांनी अपघाती मृत्यू अहवाल (ADR) नोंदवून घेतला.
मोठी बातमी : महिला जास्त खोटं बोलतात की पुरुष, आता मिळालं उत्तर..
कुशल याने टोकाचं पाऊल उचललं तेंव्हा कुशल यांची पत्नी भारतात नसल्याचं पोलिसांनी अधिक माहिती देताना स्पष्ट केलंय. कुशल यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत कोणालाही जबाबदार ठरवू नये असं लिहिण्यात आलं होतं.
what is reason behind kushal punjabis sad decision
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.