Baba Siddiqui: मला गोळी लागलीये आता...; बाबा सिद्दिकींचे अखेरचे शब्द काय होते? कार्यकर्त्यांने सांगितला 'तो' प्रसंग

Baba Siddiqui Murder Case: बाबा सिद्दीकी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. रुग्णालयात नेण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर त्यांच्या तोंडून निघालेले अखेरचे शब्द काय होते हे समोर आले आहे.
Baba Siddiqui Murder
Baba Siddiqui MurderESakal
Updated on

Baba Siddiqui Last Words: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीच्या सदस्यांनी 12 ऑक्टोबर रोजी मुंबईतील वांद्रे येथे त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकीच्या कार्यालयाबाहेर त्यांची हत्या केली होती. या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. आता मुंबई गुन्हे शाखेने अनेक खुलासे केले आहे. घटनेत बाबा सिद्दीकी यांना तीन गोळ्या लागल्या होत्या. गोळ्या लागल्यानंतर त्यांचे शेवटचे शब्द काय होते? याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी त्यांच्यासोबत असणाऱ्या एका कार्यकर्त्यांने या भयानक घटनेचा क्षण सांगितला आहे. त्याने बाबा सिद्दीकी यांना उपचारासाठी लीलावती रुग्णालयात नेण्याच्या काही क्षणांपूर्वीची तो प्रसंग सांगितला आहे. घटनेत बाबा सिद्दिकी यांना तीन छातीत तीन गोळ्या लागल्या होत्या. गोळ्या लागल्याच्या काही सेकंदातच तिथे गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. अशातच बाबा सिद्दिकींच्या तोंडून निघालेले ते शब्द शेवटचे ठरले आहेत.

Baba Siddiqui Murder
Baba Siddiqe: सिद्दीकींच्या हत्येसाठी कोणाच्या खात्यांमध्ये आले 50-50 हजार रुपये? शूटर शिवकुमारच्या सोशल मीडिया पेजवर पोलिसांना नेमकं काय सापडलं?

यावेळी बाबा सिद्दिकी म्हणाले की, मला गोळ्या लागल्या आहेत. आता मी वाचणार नाही, मी मरेन... असे शब्द त्यांच्या तोंडून निघाले होते, असं त्या कार्यकर्त्यांने सांगितले आहे. चौकशीतबाबत माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शूटर झीशान यांच्या कार्यालयाबाहेर थांबले होता. बाबा सिद्दिकी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसह, पोलीस अंगरक्षक आणि ड्रायव्हरसह कार्यालयातून निघाले असताना ते त्यांच्या कारजवळ आल्यावर नेमबाजांनी गोळीबार केला. यात त्यांचा मृत्यू झाला. 13 ऑक्टोबर रोजी बडा कब्रस्तान येथे सिद्दीकींच्या पार्थिवावर पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे गूढ कायम आहे. या प्रकरणी पोलीस अधिकारी सर्व संभाव्य कोनातून तपास करत आहेत. लॉरेन्स बिश्नोई टोळीने टोळीच्या सदस्याने केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये हत्येची जबाबदारी स्वीकारली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी असलेल्या संबंधांमुळे आणि सलमान खानसोबत असलेल्या मैत्रीमुळे सिद्दिकींची हत्या करण्यात आल्याचे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच अभिनेता सलमान खानशी संबंधित असलेल्यांना परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.