मुंबई : वरिष्ठ कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येनं देशात खळबळ उडाली आहे. त्यांच्या एनडी स्टुडिओवर कर्जबाजारीपणामुळं जप्ती येणार असल्यानं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं स्पष्ट झालं आहे.
पण आता त्यांच्या एनडी स्टुडिओचं काय होणार? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. या चर्चांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत माहिती दिली. (What will happen to ND Studio after Nitin Chandrakat Desai Devendra Fadnavis replied in hall)
एनडी स्टुडिओबाबत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यांनी म्हटलं की, "नितीन देसाईंनी आत्महत्या केली ही दुःखद गोष्ट आहे. त्यांनी ऑडियो क्लिप्समध्ये पुरावे दिले आहेत. त्यांच्यावर कर्ज आणि वसुलीसाठी लोक मागे लागले होते. त्या मानसिक तणावातून त्यांचा मृत्यू झाला असावा. (Latest Marathi News)
याची चौकशी झाली पाहिजे, सत्यता समोर आली पाहिजे. नितीन देसाई यांचा एनडी स्टुडिओ शासनाने ताब्यात घ्यावा. या स्टुडिओवर कर्ज आहे, त्यामुळं लिलाव करण्यापेक्षा शासनाने स्टुडिओ घ्यावा"
याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, नितीन देसाई हे खऱ्या अर्थाने चित्रपट सृष्टीतील महत्वाचे नाव होतं. कला दिग्दर्शनात बस्तान बसवलं, मराठी माणसाला अभिमान वाटावं असं काम त्यांनी केलं.
अनेक मोठे कार्यक्रम, त्याच्या थीम काय असाव्यात, मोठे प्रोजेक्ट ते डिझाईन करायचे. दिल्लीतील महाराष्ट्राचे चित्ररथ त्यांच्या माध्यमातून साकारले गेले. त्यांचा स्टुडिओ गहाण होता. याबाबत कोर्टाचा निकाल त्यांच्याविरोधात गेला होता. (Marathi Tajya Batmya)
आशिष शेलार यांनी हा जो विषय मांडला ते तपसून घेऊ. याप्रकरणात जाणीवपूर्वक स्टुडिओ ताब्यात घेण्यासाठी काही केलं गेलंय का? जबरदस्ती केली गेलीए का? नियमा बाहेर जाऊन व्याज लावले का? याची चौकशी सरकार करेल.
एका मराठी माणसाचा स्टुडिओ आहे. कायदेशीर बाजू तपासून घेऊन आठवण म्हणून स्टुडिओचं काय करता येईल? याबाबत कायदेशीर बाब तपासू घेऊ, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.