मोखाडा : श्रमजीवी संघटनेच्या हक्काग्रह या अभिनव आंदोलनाच्या चौथ्या दिवस अखेर मोखाडा पोलिसांनी सतत तीन दिवस 140 हक्काग्रहीवर गुन्हे दाखल केले आहेत. अशात विवेक पंडित हे मोखाड्यात आले त्यांनी, पोलिस निरीक्षक संजय आंबरे यांना हक्काग्रहाच्या जागेवर बोलावून त्यांना कायदा समजावीत शाळा घेतली. मी स्वतः आलोय आता मला अटक करा असे खुले आव्हान दिले आहे.
आदिवासी भुकेलेले आहेत, पालघर जिल्ह्यात सर्वात जास्त कुपोषण, स्थलांतर, बेरोजगारी या समस्या मोखाड्यात आहेत. अशा स्थितीत लोक आपल्या हक्कासाठी शांतपणे एकत्र येत शारिरीक अंतर पाळून हक्काग्रह आंदोलन करत आहेत. त्यांनी कसा काय कायदा मोडला असा जाब विचारला असता, पोलिस निरीक्षक आंबरे यांची याबाबत खुलासा करता चांगलीच भंबेरी उडाली होती. यावेळी विवेक पंडित यांनी मनाई आदेश वाचून कलम 144 ची पूर्ण माहिती देऊन पोलिस निरीक्षक यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली.
सदर पोलिस निरीक्षक हे अवैध दारूच्या अड्डयांबाबत माहिती देऊनही गुन्हे दाखल करत नाहीत आणि गरीब कष्टकरी भुकेल्या आंदोलकांच्या बाबतील स्वतःला 'कर्तव्यदक्ष' समजतात असा आरोप विवेक पंडित यांनी यावेळी केलाय.
संध्याकाळी हक्काग्रह आंदोलन सांगता होताच विवेक पंडित यांनी आणि सोबतच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाणे गाठले. स्वतःची नावे देत गुन्हा दाखल करून आरोपी करावे अशी मागणी करत पोलिसांनी आम्हाला आत्ताच अटक करावी अशी मागणी करत पोलिस ठाण्यात ठाण मांडले.
यावेळी विवेक पंडित यांच्या सोबत श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर, विजय जाधव, ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक सापटे, पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश रेंजड, युवक जिल्हा अध्यक्ष प्रमोद पवार यांच्यासह जिल्हा सचिव उल्हास भानुशाली, सीता घाटाळ, महेश धांगडा, दीपक खंडागळे, सुजित घरत, विलास मोरघे, कौशल भरती यांनी व मोखाड्यातील कार्यकर्ते पांडू मालक, गणेश माळी आणि हक्काग्रह करणारे मोखाडा सभासद यांच्यासोबत आम्हालाही आरोपी करा यासाठी स्वतःचीच नावे दिली आहेत.
जिल्हाधिकार्याच्या आदेशान्वये संचारबंदी कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्याचे मोखाडा पोलिसांनी सांगितले.
when agitators tells cops to arrest them for doing agitation read interesting lockdown story
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.