मुंबईत येताय? 'या' प्रवाशांना मिळणार RT-PCR चाचणीतून सूट

मुंबईत येताय? 'या' प्रवाशांना मिळणार RT-PCR चाचणीतून सूट पाहा, तुम्ही या विशेष गटात बसताय का? While travelling to Mumbai via flight passengers who took both doses of Covid vaccine to be exempted from RT-PCR
RT-PCR Test
RT-PCR Test Google file photo
Updated on

पाहा, तुम्ही या विशेष गटात बसताय का?

मुंबई: कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात पालिकेला यश आले असले तरी तिसऱ्या लाटेचा धोका आरोग्य तंज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी आणि विशेषत: व्यावसायिकांसाठी देशांतर्गत विमान प्रवासादरम्यान RT-PCR चाचणी बंधन ठेवू नये, अशी मागणी मुंबई पालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी राज्य सरकारला केली. या आशयाचे एक पत्र आयुक्तांनी राज्य सरकारला दिले. त्यामुळे आता राज्य सरकारने या पत्राला मंजुरी दिली की देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या दोन डोस घेतलेल्या नागरिकांना RT-PCR चाचणीतून दिलासा मिळणार आहे. (While travelling to Mumbai via flight passengers who took both doses of Covid vaccine to be exempted from RT-PCR)

RT-PCR Test
'गेटवे'जवळ समुद्रात पडली महिला, फोटोग्राफरनेही मारली उडी अन्...

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या व्यावसायिकांना RT-PCR चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. गुजरात, गोवा, राजस्थान, केरळ या राज्यातून मुंबईत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला RT-PCR चाचणी बंधनकारक होती. पण, महाराष्ट्रातील पर्यटन आणि उद्योग या दोन गोष्टींचा विचार करता नवीन नियम लागू करावा अशी विनंती राज्य सरकारला करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना RT-PCR चाचणीतून वगळण्यात यावे, यासाठी आयुक्तांनी पत्र दिले असून राज्य सरकारने यास मंजूरी दिल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.