Baba Siddiqui Case Update: कोण आहे मुंबई पोलिसांचा सिंघम? ज्यांनी जीव धोक्यात घालून बाबा सिद्दिकींच्या शूटर्सना पकडलं!

Baba Siddiqui Murder Update News: महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठे नाव आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. बिश्नोई टोळीच्या आरोपींनी त्यांची हत्या केली आहे. यावेळी दोन आरोपींना पकडणाऱ्या दबंग पोलीस अधिकाऱ्याचे नाव समोर आले आहे.
Policeman Rajendra Dabhade
Policeman Rajendra DabhadeESakal
Updated on

Policeman Rajendra Dabhade News: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मोठे अपडेट समोर आले आहेत. बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप या दोन आरोपींना अटक केली आहे, तर तिसरा आरोपी शिवा आणि चौथा झीशान अख्तर फरार आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. यावेळी घटना घडल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना पकडलं होतं. मात्र यावेळी ज्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून या आरोपींना पकडलं त्यांचं नाव आता समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र दाभाडे असे बाबा सिद्दिकींच्या मारेकऱ्यांना पकडणाऱ्या धाडसी पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. मुंबई पोलिसांचे धाडसी एपीआय राजेंद्र दाभाडे यांनी धावत जाऊन बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही गोळीबारांना पकडले. निर्मल नगर पोलीस ठाण्यात कार्यरत एपीआय राजेंद्र दाभाडे हे देवीच्या विसर्जनासाठी खेरवाडी परिसरात बंदोबस्तात तैनात होते. बाबा सिद्दीकींना गोळ्या लागल्याचे पाहून एपीआय राजेंद्र दाभाडे यांनी धाडस दाखवत दोन्ही आरोपींना पकडले, तर आरोपींच्या हातात बंदुका होत्या. त्या देखील हिसकावून घेतल्या आहेत.

Policeman Rajendra Dabhade
Who is Anuj Thapan: ज्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी Bishnoi Gang नं बाबा सिद्दिकींना मारलं, तो Anuj Thapan नेमका आहे तरी कोण?

तर गर्दीचा आणि फटाक्यांच्या धुराचा फायदा घेत एक आरोपी फरार झाला. सध्या मुंबई गुन्हे शाखेचे पथक बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. रविवारी झालेल्या घटनेची माहिती देताना मुंबई गुन्हे शाखेचे डीसीपी दत्ता नलावडे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबई पोलिसांनी तत्परता दाखवली होती. या प्रकरणाचा तपास तातडीने गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. आमच्या पथकाने तात्काळ २ आरोपींना पकडले. आरोपींकडून दोन पिस्तुलेही जप्त करण्यात आली आहेत.

Policeman Rajendra Dabhade
Baba Siddiqui Case Update: धमकी आल्यानंतर बाबा सिद्दिकींना सुरक्षा का दिली नाही? काँग्रेस नेते संतापले, पोलीस आणि सरकारवर ओढले ताशेरे

मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींनी मिरचीचा स्प्रे आणला होता. पहिला आरोपी फवारणी करून नंतर गोळीबार करणार होता. मात्र तिसरा आरोपी शिवकुमार गौतम याने थेट गोळीबार सुरू केला. धर्मराज कश्यप याच्याकडे मिरचीचा स्प्रे होता, पण तो स्प्रे मारण्याआधीच तिसऱ्या आरोपीने गोळीबार केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.