मलिकांनी आरोप केलेले नीरज गुंडे कोण? ; RSS ते श्रीनिवासन.. वाचा कनेक्शन

गुंडेंनी बाहेर आणलेली माहिती महत्वाची असल्याने मंत्रीमहोदयांनी त्वरित चौकशीचे आदेश दिले
मलिकांनी आरोप केलेले नीरज गुंडे कोण? ; RSS ते श्रीनिवासन.. वाचा कनेक्शन
Updated on

मुंबई : महाविकास आघाडी सरकार आणि भारतीय जनता पक्षाच्या वादात सोमवारी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस ड्रग्ज रॅकेट चालवतात असा आरोप करीत खळबळ माजवून दिली असतानाच नीरज गुंडे यांच्या चेंबूरच्या घरी बसून फडणवीस त्यांचे मायाजाल टाकत असत असा उल्लेख केला आहे. या आधीही मलिक यांनी नीरज गुंडेंचे नाव घेत आरोप केले होते.

सोमवारी मायाजालाचा आरोप होताच प्रसिध्दीमाध्यमांनी गुंडे यांचे चेंबूरमधले घर गाठले. त्यांच्या घरासमोर किमान १५ ओबी व्हॅन्स उभ्या होत्या. मात्र काहीही बोलणार नाही असे नम्र उत्तर देतानाच पत्रकारांना पाणी आणि चहा पाठवण्याचे सौजन्य गुंडे परिवार दाखवत होता. निराश झालेले पत्रकार परत फिरले.

दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नबाब मलिकांच्या आरोपांना उत्तर देताना त्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा प्रत्यारोप करीत दिवाळीनंतर माहिती देण्याची घोषणा केली. त्याच वेळी नीरज गुंडे हे आमच्या संबंधातले आहेतच पण ते माझ्यापेक्षाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मित्र आहेत. या मैत्रीबद्दल उद्धवजींना विचारा असे सांगत होते.

मलिकांनी आरोप केलेले नीरज गुंडे कोण? ; RSS ते श्रीनिवासन.. वाचा कनेक्शन
राज्य बॅंकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड

हे नीरज गुंडे आहेत तरी कोण असा प्रश्न त्यामुळे पुन्हा एकदा पुढे आला आहे. सहा फूट उंच ,गोरेले गुंडे कधीही प्रकाशझोतात येत नाहीत. मंत्रालयातला भ्रष्टाचार अन् मुंबई परिसरातील अधिकाऱ्यांचे हितसंबंध यावर ते कायम ट्विट करत असतात. या ट्विट्सची संख्या भाजप नेते किरीट सोमैयांच्या माहितीखालोखाल असते. ती माहिती महत्त्वाचीही मानली जाते. एसआरएतील एका व्यवहाराबद्दल त्यांनी ट्वीटरव्दारे आक्षेप नोंदवताच गृहनिर्माणमंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी लगेचच विभागीय चौकशीचे आदेश जारी केले.

गुंडेंनी बाहेर आणलेली माहिती महत्त्वाची असल्याने मंत्रीमहोदयांनी त्वरित चौकशीचे आदेश दिले असे त्या खात्याचे अधिकारी सांगतात. स्वत:ला समाजजागल्या " व्हिसलब्लोअर "म्हणवणारे गुंडे संघपरिवाराशी संबंधित. वावर फक्त या वर्तुळापुरता मर्यादित नाही तर क्रिकेट असोसिएशनच्या श्रीनिवासन यांच्यापासून तर छोटया मोठया अधिकारी कर्मचाऱ्यापर्यंत सगळ्यांमध्ये उठबस.उद्धव ठाकरे ,त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे ,मुले आदित्य आणि तेजस या अख्ख्या परिवाराशी त्यांचे संबंध. ही कौटुंबिक मैत्री २००८ ,२००९ पासूनची. सगळ्यांशी मैत्र राखणारे नीरज गुंडे एकेकाळी

देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे यांव्यातला पूल होते असे सेना भाजपच्या राजकीय वर्तुळात कायम बोलले जाई. उद्धव ठाकरेंशीच गुंडे यांची मैत्री आहे असे नव्हे तर त्यांच्या कुटुंबात त्यांना आपले मानले जाते म्हणतात. २०१४ साली सेनेने स्वबळावर निवडणूक लढल्यावर उभय पक्षात कमालीचा तणाव होता. त्यावेळी एके दिवशी अचानक आदित्य ठाकरे दिल्लीत पंतप्रधान मोदींना भेटल्याचे वृत्त झळकले. ही भेट फक्त गुंडे घडवू शकतात अशी चर्चा रंगली होती. त्यानंतर विरोधी वाकांवरून शिवसेना फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सामील झाली तेव्हाही या निर्णयाची पार्श्वभूमी गुंडेंच्या घरी सहभोजनात तयार झाली असे म्हणतात. प्रियम मोदी यांनी लिहिलेल्या पुस्तकात तसे उल्लेखही आहेत.

सेना भाजपची फारकत झाली त्यानंतरही गुंडे मातोश्रीच्या संपर्कात होते. ठाकरेंशी त्यांचे संबंध परिवाराला प्रिय असणाऱ्या हिंदुत्ववादी विचारधारेमुळेच निर्माण झाले असे म्हणतात. सोमवारी मलिक यांनी आरोप केल्यानंतरही गुंडे उत्तर द्यायला सरसावले नाहीत ,चिडले नाहीत .त्यावर टिप्पणी करायला त्यांनी ट्विटरचा त्यांना आवडणारा मार्गही चोखाळलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.