Who Killed Baba Siddique: 2019 मध्ये हत्या, तुरुंगात बिश्नोई गँगशी ओळख अन् मुंबईत गोळीबार... कोण आहे बाबा सिद्दीकींची हत्या करणारा कर्नेल सिंग?

Karnail Singh Baba Siddique Killer: रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या हरियानातील कर्नेल सिंगला 2019 मध्ये एका हत्येप्रकरणात अटक करण्यात आली होती.
Baba Siddique Murder Case
Baba Siddique Murder CaseEsakal
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. हरियाणाचा कर्नेल सिंग आणि यूपीचा धर्मराज कश्यप अशी त्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींनी स्वतःचे बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचे जाहीर केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी 25-30 दिवसांपासून मुंबईत होते.

दरम्यान काल ग बाबा सिद्दीकी यांना मारण्यासाठी रिक्षातून घटनास्थळी पोहोचले होते. दरम्यान या हत्येमध्ये सहभागी असलेले आरोपी बिश्नोई गँगशी संबंधीत असल्याचे समोर आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

कोण आहे गोळी झाडणारा कर्नेल सिंग?

बाबा सिद्दीकी यांची काल मुंबईत हत्या झाल्यामुळे मुंबईसह महाराष्ट्र हादरला आहे. अशात या प्रकरणातील आरोपी कर्नेल सिंग बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचे समोर आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. कारण कर्नेल सिंग हा बिश्नोई गँगच्या संपर्कात होता अशी माहिती साम टीव्हीला सूत्रांची दिली आहे.

रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या हरियानातील कर्नेल सिंगला 2019 मध्ये एका हत्येप्रकरणात अटक करण्यात आली होती. याप्रकरणी तुरुंगात असताना कर्नेल सिंग बिश्नोई गँगच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. त्यामुळे बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागील बिश्नोई गँग कनेक्शन समोर आले आहे.

दरम्यान बाबा सिद्दीकी आणि अभिनेता सलमान खान यांच्यातील मैत्री सर्वश्रृत आहे. गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता सलमान खानला सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अशात काही महिन्यांपूर्वी सलमानच्या गॅलेक्सी निवासस्थनाबाहेर गोळीबार करण्यात आला होता. त्यामुळे सलमानशी असलेल्या संबंधामुळे सिद्दीकींची हत्या झाली आहे का? या अँगलने मुंबई पोलीस करत आहेत.

Baba Siddique Murder Case
Baba Siddique Murder: बाबा सिद्दीकींनी कसा मिटवला शाहरुख-सलमानमधील वाद, 'त्या' पार्टीत नेमकं काय घडलं होतं?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले लोक हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील आहेत. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीची भूमिकाही तपासली जात आहे. सध्या मुंबई गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे. हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, काही व्यावसायिक वैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे मानले जात आहे.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यादरम्यान दोन ते तीन गोळ्या झाडण्यात आल्या. सिद्दीकी यांना १५ दिवसांपूर्वी जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या आणि त्यांना ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा देण्यात आली होती.

Baba Siddique Murder Case
Baba Siddique Political Career: बिहार जन्मभूमी तर मुंबई कर्मभूमी; राजकारणासह सिनेसृष्टीत बाबा सिद्दीकींनी कसा निर्माण केला दबदबा?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.