Inside Story : डॉक्टर बॉम्ब आहे तरी कोण ? 

Inside Story : डॉक्टर बॉम्ब आहे तरी कोण ? 
Updated on

मुंबई - पोलिस कितीही सतर्क असले तरीही गुन्हेगार आपल्या सुटकेसाठी काय करेल काही सांगता येत नाही. असाच प्रकार मुंबईत घडलाय. १९९३ च्या अजमेर बॉम्बस्फोटातील आरोपी मोहम्मद जालिस अन्सारी उर्फ डॉक्टर बॉम्ब हा फरार झाल्याची माहिती समोर येतेय. डॉक्टर बॉम्ब हा गेल्या काही दिवसांपासून पॅरोलवर होता. शुक्रवारी त्याला मुंबईच्या आगरीपाडा पोलिस ठाण्यात हजार करण्यात येणार होतं. मात्र त्यापूर्वीच तो अचानक बेपत्ता झाला. त्यामुळे आता मुंबईसह संपूर्ण देशात पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

नक्की आहे तरी कोण डॉक्टर बॉम्ब ? 

मोहम्मद जालिस अन्सारी उर्फ डॉक्टर बॉम्ब हा मूळचा मुंबईतील आगरीपाडा  येथील मोमीनपुरा इथला रहिवासी होता. विशेष म्हणजे डॉक्टर बॉम्ब हा MBBS डॉक्टर आहे. डॉक्तर बॉम्ब हा एक दोन नव्हे तर तब्बल ५० बॉम्बस्फोट घडवून आणणारा आरोपी आहे. १९९३ च्या अजमेर बॉम्बस्फोटात त्याला दोषी ठरवत न्यायलयनं जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मुंबईतील साखळी बॉम्बब्लास्टमध्ये देखील त्याचा हात होता.  डॉक्टर बॉम्ब १९९४ पासून जेलमध्ये आहे. अजमेरमध्ये ५ आणि ६ डिसेंबर १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटात तो दोषी होता.

कसं पडलं डॉक्टर बॉम्ब हे नाव

जालिस हा सुरुवातीपासून स्टुडंट इस्लामिक  मुव्हमेंट ऑफ इंडिया (SIMI) आणि इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांशी संबंधित होता. तिथे तो दहशतवाद्यांना बॉम्ब कसे बनवतात याचं प्रशिक्षण देत होता. त्यामुळेच त्याचं नाव डॉक्टर बॉम्ब असं पडलं. 

अजमेरमध्ये १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात आणि त्यासोबतच देशभरातील तब्बल ५० बॉम्बस्फोट प्रकरणांमध्ये त्याचा समावेश आहे. म्हणूनच सीबीआयने मुंबईच्या आगरीपाडा येथे राहणाऱ्या जालिस अन्सारी याला अटक केली होती. चौकशीमध्ये त्याच्यावरचे  सर्व आरोप सिद्ध झाले होते. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने  डॉक्टर बॉम्ब याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर डॉक्टर बॉम्ब  याला अजमेर येथील तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वीच तुरुंगातूनच त्याने पॅरोलच्या सुट्टीसाठी अर्ज केला होता. या अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने त्याला २१ दिवसांची सुट्टी मंजूर केली होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डॉक्टर बॉम्ब याला २८ डिसेंबरला बाहेर सोडण्यात आलं होतं. त्यामुळे डॉक्टर बॉम्ब हा दररोज सकाळी १० ते १२ च्या दरम्यान  आगरीपाडा पोलिस ठाण्यात येऊन हजेरी देत होता. मात्र, गुरुवारी तो हजेरीसाठी आलाच नाही. तो कदाचित प्रार्थना करायला गेला असेल असं पोलिसांना वाटलं. पोलिसांनी प्रर्थांनास्थळी जाऊन त्याचा शोध घेतला पण तो सापडला नाही. त्यामुळे यावर कारवाई करत पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्याच्या मुलाने डॉक्टर बॉम्ब सकाळपासून घरी नसल्याचं सांगितलं.

who is mohammad jalis ansari who was involved in 1993 ajmer bomb blast and now a bsconding

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.