Gudhi Padwa Shobha Yatra: मुंबईत गुढी पाडव्याच्या शोभायात्रा कोणी सुरु केल्या? काय आहे यामागचा इतिहास? जाणून घ्या

राज्यभरात आज मराठी नववर्ष आणि गुढी पाडव्याचा उत्साह आहे. यानिमित्त मुंबईतील विविध भागांत शोभायात्रांचे आयोजन करण्यात आलं होतं.
Gudhi Padwa
Gudhi Padwa
Updated on

मुंबई : राज्यभरात आज मराठी नववर्ष आणि गुढी पाडव्याचा उत्साह आहे. यानिमित्त मुंबईतील विविध भागांत शोभायात्रांचे आयोजन करण्यात आलं होतं. पारंपारिक मराठी साजश्रृंगार आणि ढोल-ताशांच्या गजरात निघणाऱ्या या शोभायात्रा या खास असतात.

महिला वर्ग नऊवारी साडी, साजश्रृंगार नाकात नथ, डोक्यावर रंगिबेरंगी महाराष्ट्रीय फेटे, डोळ्यावर रेबॅनचे गॉगल आणि बुलेटवरुन स्वारी. तर दुसरीकडं ढोल-ताशांच्या गजर करत पुरुष मंडळींनी कुर्ता-पायजमा असा संपूर्ण माहौल या शोभा यात्रांमध्ये पाहायला मिळत आहे. पण मुंबईत निघणाऱ्या शोभायात्रांना कशी सुरुवात झाली? आणि ती कोणी सुरु केली, हे जाणून घेऊयात. (Who started Gudhi Padwa Shobha Yatra in Mumbai What is the history behind it)

Gudhi Padwa
Gudhi Padva: राज्यात गुढी पाडव्याचा उत्साह; मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरात शोभायात्रेच आयोजन, शिंदे-फडणवीसांची हजेरी

मराठी संस्कृती टिकवण्याची प्रेरणा

मराठी संस्कृती टिकवण्याच्या हेतूनं आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित होऊन सन १९९९ साली मुंबईतल्या मराठी भागांत मराठी नववर्षानिमित्त गुढी पाडव्याला या शोभायात्रांना सुरुवात झाली. याची सुरुवात डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानच्यावतीनं झाली. या संस्थानचे अध्यक्ष आबासाहेब पटवारी यांनी ही संकल्पना मांडली होती. खरंतर डोंबिवलीतून सुरु झालेली ही शोभायात्रांना सुरुवात झाली. मुंबईतल्या गिरगाव, परळ, दादर या भागातील मराठी नागरिक या भागात स्थलांतरित झाल्यानं डोंबिवलीत या शोभायात्रांना सुरुवात झाली. (Marathi Tajya Batmya)

Gudhi Padwa
Shiv Sena : काल काँग्रेसमध्ये इफ्तार पार्टी अन् आज शिवसेना प्रवेश! कोण आहेत राजू वाघमारे?

ठाण्यातही शोभायात्रांना सुरुवात

त्यानंतर पुढच्याच वर्षी सन २००० साली ठाण्यातील श्री कौपिनेश्वर मंदिरानंही अशाच प्रकारची शोभायात्रा काढली. यानंतर पुढे ही परंपरा कायम राहिली. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढी पाडव्याच्या दिवशी देवींचे वेश परिधान करुन यात्रांना सुरुवात झाली. यामध्ये पारंपारिक वाद्ये जसं ढोल-ताशे वाजवून मिरवणुका काढल्या जाऊ लागल्या. (Latest Marathi News)

Gudhi Padwa
RBI Action: रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई; 'या' बँकेतील ग्राहकांना खात्यातून पैसे काढता येणार नाहीत

यात्रेत झाले आधुनिक बदल

त्यानंतर त्यात दरवर्षी नवनव्या गोष्टींचा अंतर्भाव होत गेला. त्यानुसार, या शोभायात्रांमध्ये बालशिवाजी त्यांचे छोटे मावळे

, महिलांकडून नववारी साड्या, संपूर्ण अंगर साजश्रृंगार तर पुरुषांकडून कुर्ता-पायजमा आणि फेटे अशा मराठमोळ्या पेहरावांचा या शोभायात्रांमध्ये समावेश झाला. त्यानंतर जसजसा काळ पुढे सरकत गेला तसा त्यात आधुनिक बदलही दिसू लागला. त्यानुसार पारंपारिकतेला कुठेही धक्का न लावता त्यात बुलेटसारख्या पुरुषी ओळख असलेल्या बाईक्सवरुन महिला साडी घालून पारंपारिक वेशात आणि डोळ्यावर गॉगल लावून त्यांचा वेगळाच अॅटिट्यूड या शोभायात्रांमध्ये दिसायला लागला. (Latest Maharashtra News)

Gudhi Padwa
Kalyan Loksabha: श्रीकांत शिंदेंसाठी कल्याणची आव्हानं संपेनात; गणपत गायकवाडांच्या पत्नीनं घेतली ठाकरेंच्या उमेदवाराची भेट

राजकीय प्रेरणा

पण या शोभायात्रा काढायला राजकीय स्थितीही प्रेरित ठरली होती. कारण १९९२ मध्ये बाबरीचा विध्वंस त्यानंतर मुंबईत झालेल्या दंगली आणि हिंदुत्वाची निर्माणं झालेली हवा. त्याच मुंबई शिवसेनेनं राबवलेला मराठीपणाचा आणि हिंदु संस्कृतीचा अजेंडा यामुळं अशा पद्धतीच्या शोभायात्रांसाठी पथ्यावर पडलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.